झाडीबोली साहित्य मंडळाच्या राज्यस्तरीय महाकाव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहिर

    37

    ?अर्जूमन शेख यांची रचना सर्वोत्कृष्ट

    ✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.14ऑक्टोबर):- झाडीबोली साहित्य मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय आॕनलाईन महाकाव्य लेखन स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे घोषित करण्यात आलेला असून विजेत्यांना आॕनलाईन सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे.
    सर्वोकृष्ट रचना म्हणून -कवयित्री अर्जुमन शेख बल्लारपूर ,उत्कृष्ट रचना विरेनकुमार खोब्रागडे चंद्रपूर प्रगती सोनटक्के गडचिरोली
    ललित बोरकर, जळगाव तर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.

    स्मिता डि पुणे, नागेंद्र नेवारे चंद्रपूर, डॉ. चंद्रकांत लेनगुरे गडचिरोली , द्वितीय क्रमांकाचे मानकरी माधुरी फालक उल्हासनगर ,परमानंद जेंगठे चंद्रपूर ,मयूर पालकर मुंबई ठरले आहे. तर तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहे प्रशांत भंडारे बल्लारपूर, ज्ञानेश्वर दुंडे पुणे, सविता झाडे-पिसे चंद्रपूर ,विश्वनाथ गावडे रत्नागिरी . चतुर्थ क्रमांक- शीला चिंचोळकर अकोला
    , दिगंबर आडीत रायगड , प्रकाश फर्डे शहापूर यांनी प्राप्त केलेला आहे.

    पाचवा क्रमांक रविंद्र गिमोणकर नागपूर, बबन शेळके, हिंगोली ,मनोहर राठोड, यवतमाळ उत्तेजनार्थ क्रमांक म्हणून चंद्रशेखर कानकाटे चंद्रपूर , सुनिता घुले, संगमनेर , बेनिराम ब्राम्हणकर चंद्रपूर, शितल कर्णेवार चंद्रपूर, शुभांगी कुलकर्णी मुंबई , वर्षा शिदोरे नाशिक लक्षवेधी क्रमांक म्हणून
    छाया गावडे पुणे , दिनेशकुमार अंबादे गोंदिया, हर्षा पाटील पालघर, सुनील कोवे बल्लारपूर, मनीषा रायजादे सांगली, सुचिता
    कराळे पुणे यांनी प्राप्त केलेला आहे.

    ह्या महाकाव्यस्पर्धेचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , संयोजक अरूण झगडकर तर संकलक रामकृष्ण चनकापुरे होते . केंद्रीय समितीने झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डाॕ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षपरिपुर्ती निमित्ताने ह्या स्पर्धेचे नियोजन केले होते ,परीक्षेकाचे कार्य पालिकचंद बिसने, प्रा.आश्विन खांडेकर , प्रसन्नजित गायकवाड , राजेंद्र घोटकर , सुरज दहागावकर , सुरज पेंढरवाड यांनी केले होते. 

    ह्या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एकूण १५६ कवींनी उत्तम रितीने सहभाग नोंदविला. गेल्या चार महिन्यापासून सलग पाच प्रकारात ही मॕरेथान स्पर्धा पार पडली . वैश्विक महामारी असूनही संकटाची भिती न ठेवता स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घेत सर्वांनी सहभाग दर्शविला, हे कौतुकास्पद आहे.

    ह्या स्पर्धेच्या निमित्ताने नवोदित कवींना कवितेचे नवनवीन प्रकार शिकायला मिळाले.जसे की पारंपारिक काव्यरचना,अष्टाक्षरी काव्यलेखन ,हायकु ,अभंग रचना,मुक्तछंद काव्यलेखन यासारख्या काव्य प्रकाराचे काही नियम त्यांना आत्मसात करता आले.ह्या अनोख्या झाडीबोली प्रिमियर लीग फेरीच्यावेळी काव्यप्रकाराविषयी देण्यात येणाऱ्या सूचनांमुळे स्पर्धेत शिस्त होती, हे विशेष .