समता परिषद ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाची – छगन भुजबळ

    55
    Advertisements

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.11नोव्हेंबर):-गेली २८ वर्ष कार्य करणारी समता परिषद ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाची आहे मी अनेक वर्षे ओबीसी समाजासाठी लढलो आणि इथून पुढे देखील लढणार असल्याचे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले..मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

    पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की महात्मा फुले यांचा विचार घेऊन उभे राहनारा प्रत्येक कार्यकर्ता मला हवा आहे. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गावो गावी समता परिषदेचे काम केले पाहिजे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कोणाचाही विरोध नाही पण हे आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून नको मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी समाजाची मागणी आहे.. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले…

    समता परिषदेच्या स्थापना झाली त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी गावो-गावी जाऊन परिषदेचे काम केले. आता सुद्धा कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन काम केले पाहिजे जिल्हाध्यक्षांनी तालुकाप्रमुख,गावप्रमुख्यांच्या नेमणूक करण्यात याव्यात आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.समाजात सोशल मिडीयाचा वापर वाढतो आहे पण सोशल मीडियाचा वापर हा फुले शाहू आंबडेकर यांचा विचार पसरवण्यासाठी करा असे आवाहन देखील श्री भुजबळ यांनी यावेळी केले…

    समता परिषदेच्या बैठकीला लेखक व विचारवंत हरी नरके देखील उपस्थित होते… मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर ओबीसी समाजाला मोठा फायदा झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संसदेत माजी खासदार समीर भुजबळ यांनी ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असा प्रस्ताव मांडला आणि त्याला अगदी भाजपचे नेते कै.गोपीनाथ मुंडे यांनी देखील पाठिंबा दिला पण यासाठी अनेक दिवस छगन भुजबळ यांनी केंद्रातल्या लोकांशी चर्चा केल्या होत्या अशी आठवण देखील हरी नरके यांनी यावेळी सांगितली.

    अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ , प्रा हरी नरके,महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, शिवाजीराव नलावडे, डॉ. कैलास कमोद, प्रा दिवाकर गमे, उपस्थित होते.