धुळ्याच्या सौ कविता ताई कोळी यांचा मुंबई येथे *दादासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने सन्मान

    48
    ✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

    धुळे(दि.२३नोहेंबर):- येथील समाज सेवीका , सौ.कविता ताई कोळी आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश अध्यक्षा, पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख ,दादा साहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म इंडस्ट्रीज कंपनी मेंबर्स .यांना मुंबई येथे दासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने नुकतेच २३ नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले* मुंबई येथे दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशनचे फाऊंडर चेअरमन फिल्म प्रोड्युसर मा. डॉ.कल्याणजी जाना यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि २३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील ग्रॅड पेन इन सुला या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते.

    अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच सदरील पुरस्कार हा देशभरातील मोजक्याच उत्कृष्ट सामाजसेवकांना मिळाला आहे.त्यात आपल्या धुळ्याच्या सौ कविता ताई कोळी यांना दादासाहेब फाळके कोवीड-१९ योध्या अवॉर्ड पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.कोवीड-१९ लॉक डाऊनमध्ये केलेल्या कामाचा हा सन्मान आहे.कविता कोळी ह्या धुळे येथील सामाजिक, राजकीय कार्य करणारे स्वर्गवासी नाना कोळी यांच्या सुकन्या आहेत. कविता कोळी शिक्षिका असुन नेहमीच सामाजिक कार्य मधे अग्रेसर असतात… लॉक डाऊन दरम्यान अनेक गरजु लोकांना किराणा किट वाटप केले व सहकार्य केले…
    सौ कविता ताई कोळी यांनी आपल्या सामाजिक कार्याचा अल्पावधीतच लक्षवेधी ठसा उमटवीला आहे.व त्या नेहमिच समाजातील पिडीत व वंचीत घटकांसाठी धावून जात असतात.सौ कविता कोळी यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर समाजातील विवीध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.