शिंदखेडा पोलीस स्टेशन चे आदर्श कार्य

    49

    ✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

    शिंदखेडा(दि.1डिसेंबर):- दि.३०नोव्हेंबर  रोजी शहरातील पोलीस स्टेशन चे पो.निरीक्षक मा.श्री.दुर्गेश तिवारी साहेब व पो.कांँ. मा.श्री.रफिक मुल्ला सर यांच्या वतीने दोन गरजू कष्टकरी महीलांना एक महीन्याचा किराणा वाटप करण्यात आला.

    सामाजिक कार्यकर्त्या सौ गीतांजली ताई कोळी यांच्या माध्यमातून दारूबंदी ची चळवळ जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून सुरू आहे.आज सौ.गीतांजली ताई तालुक्यातील जवळपासच्या देगांव,महाडपूर,निसाणे या गावात वाढत्या दारू विक्रीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला गेल्या होत्या.चर्चा झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी च्या दारूबंदी मोर्चा च्या कार्यकर्ता आदीवासी समाजाच्या श्रीमती सगुणाबाई भिल व श्रीमती राजुबाई कोळी या कष्टकरी महीलांना दानशूर व्यक्तीत्वाच्या व लोकप्रिय असलेल्या शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पो.नि.श्री.तिवारी साहेब व पो.कांँ.रफिकमुल्ला सर यांनी एक महीन्याचा किराणा देऊन मदत केली.यावेळी सौ गीतांजली कोळी तसेच पोलीस बांधव उपस्थित होते.

    शिंदखेडा तालुका पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी दारूबंदी चे कार्य असो वा समाजहिताचे कोणतेही कार्य त्यास प्रथम प्राधान्य देऊन एक आदर्श घालून देत असतात.खरोखरीच त्यांच्या औदार्याला माणुसकी ला सलाम… खरच माझ्या पोलीस बांधवाचा आम्हाला खुप अभिमान वाटतो.

    सौ गीतांजली कोळी
    संपुर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला/युवा मोर्चा.धुळे