अतुलभाऊ खुपसे-पाटिल यांच्या नेतृत्वाखाली उद्या टेम्भुर्णी येथे ऊसदर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रास्तारोको

    44

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.10डिसेंबर):- जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना त्यांचे उसाचे बिल दिलेले नाही.चौदा दिवसात ऊस बिल देने बंधनकारक असताना कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे दोन-दोन महिने लांबवून कायदा पायदळी तुडवत आहेत.मग एकही कारखानदार यासंदर्भात बोलायला तयार नाही .काही कारखानदारांनी थोडी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात एफ.आर.पी. जाहीर करून ऊस बिल जमा झाले परंतु सोलापूर जिल्ह्यात एफआरपी रक्कम अद्याप कोणत्याही करखान्याने जमा केलेली नाही.

    सांगली कोल्हापूर जिल्ह्यात कारखादारांनी शेतकऱ्यांना 3000/- व त्यापेक्षाही जास्त दर शेतकऱ्यांना दिला. परंतु सोलापूर जिल्ह्यात असे होत नाही रिकव्हरी नावाखाली शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. रिकव्हरी कमी आहे असे दाखवून दर कमी दिला जातो म्हणजे उघडपणे येथील कारखानदार रिकव्हरी चोर आहेत.आम्ही पोटच्या पोरासारखा ऊस सांभाळायचा आणि कारखानदारांनी काटा व रिकव्हरी मारून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुबाडायचे हे काम कुठे तरी थांबले पाहिजे आणि शेतकऱ्यांना बांधावर रिकव्हरी चेक करण्याची सोय असावी,कोठूनही उसाचे वाहन काटा करून आणण्याची परवानगी मिळावी.

    शेतकऱ्यांच्या नावावर काढलेले कर्ज कारखानदारांनी भरावेत आणि कारखानदारांवर फौजदारी कारवाई करावी.एक रक्कमी एफआरपी मिळावी.ऊस आमचा पैसे आमचे आणि आम्हीच पैसे हप्त्याने घेयची हा कुठला न्याय आहे. तरी माझे माय बाप सरकार ला विनंती आहे की, ऊस गेल्यापासून चौदा दिवसाच्या आत ऊस बिल मिळावे,एक रक्कमी एफआरपी जमा करावी,रिकव्हरी शेतीच्या बांधावर चेक करून त्याप्रमाणे दर मिळावा ,उसाचे वाहन कुठूनही वजन करून आणण्याची परवानगी मिळावी,कारखादारांनी शेतकऱ्यांच्या नावावर काढलेले कर्ज कारखानदारांनी भरावे व सदर कारखादारांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा दि.११/१२/२०२० रोजी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी-कुर्डुवाडी रोडवर टेम्भुर्णी येथे शेतकरी बांधवांना घेऊन रस्ता रोको करण्यात येईल.यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्ण पणे प्रशासन जबाबदार राहील याची दखल घ्यावी.