?चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे आयोजन; लाडू, केकचे केले वितरण
✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805
चंद्रपूर(दि.28डिसेंबर):-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस सोमवारी (ता. २८) शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालय परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापण्यात आला. त्यानंतर लाडूचे वितरण करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकंदरित देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. दिल्ली येथे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना वेळ मिळत नाही, हे दुर्दैव आहे. देशाला विकासाकडे नेण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पाठिशी सर्वांनी एकसंध होऊन उभे राहिले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देताना केले.
खासदार बाळू धानोरकर यांनी, काँग्रेस पक्षाची वाटचाल अहिंसा, सत्याग्रह यावर सुरू आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळसुद्धा अहिंसा, सत्याग्रह यावर चालविली आहे. काँग्रेस पक्षाने देशाला प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम केले आहे. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशाचा विकास घडविण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर नागरिकांना लाडूचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, माजी आमदार देवराव भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, सुभाष गौर, आसावरी देवतळे, महिला काँग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता अग्रवाल, विनोद दत्तात्रय, नगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक नीलेश खोब्रागडे, नगरसेवक अमजद अली, नगरसेविका विना खनके, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका ललिता रेवेल्लीवार, सोहेल शेख, अश्विनी खोब्रागडे, प्रवीण प‹डवेकर, राजू रेवेल्लीवार, विजय चहारे, अनू दहेगावकर, सुनील वडस्कर, प्रसन्ना शिरवार, मनीष तिवारी, युसूफ भाई, इक़बाल भाई, दुर्गेश कोडाम, मोहन डोंगरे, चंद्रमा यादव, केशव रामटेके, विजय धोबे, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, सचिन कत्याल, कुणाल चहारे, राजेश अड्डूर, नवशाद शेख, रुचित दवे, काशिफ अली, राहिल कादर, यश दत्तात्रय, संजय गंपावार, नीतेश कौरासे, विनोद संकत, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, काशिफ अली, रमीज़ शेख, कुणाल रामटेके, सनी लहामगे, प्रकाश अधिकारी, केतन दुर्सेलवार, वैभव येरगुडे, मोनू रामटेके, वैभव रघाताटे, बापू अन्सारी, अजय बल्की, हारुण भाई उपस्थित होते.
?सेल्फी विथ तिरंगा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थापनादिनाचे औचित्य साधून सेल्फी विथ तिरंगा अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या पुढाकारातून सेल्फी विथ तिरंगा या अभियान राबविण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांनी स्वत: सेल्फी काढून अभियानाचा प्रारंभ केला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीसुद्धा सेल्फी काढली.