निरोप देऊ सरत्याला
स्वागत नव वर्षाचे करू
खुप काही शिकलो
कास माणुसकीची धरू
नको ती आठवण सुद्धा
रोगराई अन चिंतेची
आस सुखसमृद्धी आणि
या नविन वर्षात सुखाची
नको कुणा कसले दुःख
तयारी ठेवा कष्टाची
सन्मार्गावर चालत रहा
कृपा मिळते देवाची
नविन वर्ष म्हणजे काय हो नेहमी प्रमाणे येत राहते तसेच आता ही आले पण खरोखरच २०२०या वर्षाला निरोप देताना मलाच काय सर्वांनाच आनंद होत असणार कारण या गेलेल्या वर्षात सर्वांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे.अनेकांनाआपली माणसे गमावावी लागली, अनेकांच्या हाताचे काम केले, अनेक जण बेरोजगार झाले खुप हाल सहण करावे लागले, त्या मुळे हे वर्ष कधी संपते असेच वाटत होते तर आनंदाने निरोप देऊ या वर्षाला व उत्साहाने स्वागत करू नविन वर्षाचे.आता आठवण ही नको त्या वर्षांची खुप शिकलो त्यातून आपण.
परत कधीच नको रोगराई,चिंता, दुःख आशी प्रार्थना करून नव्याने पुन्हा नव्या उमेदिने,आनंदाने नवे संकल्प करूया व
नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया.आज कोणाच्या महामारी मुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले, बेरोजगारी वाढली,अनेकांचे काम गेले, अजूनहीघराच्या बाहेर निघायला माणूस घाबरतोय.
पण अनेक आव्हानांना खंबीर पणे तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे न घाबरता खंबीर राहुन स्वतःची काळजी घेऊन कामाला सुरुवात केली पाहिजे. सध्या शाळा बंद आहेत त्या मुळे अनेक मुलांचे नुकसान होते आहे आँनलाईन शिक्षण सुरू आहे पण शहरी भागात ते व्यवस्थित होते,खेडे गावात इंटरनेट सेवा
उपलब्ध होत नाही,आणि अनेक जणांना महागडा मोबाईल घेता येत नाही,परत त्याचा खर्च हि करणे शक्य होत नाही त्यामुळे शिक्षणापासून अनेक मुले वंचित रहात आहेत.तरीही प्रत्येक संकटातून मार्ग काढत पुढे जावे लागणार आहे. आरोग्याची काळजी घेत काम करावे लागणार आहे.तर स्वतः खंबीर होऊन न घाबरता शारीरिक, आरोग्य;मानसिक साभाळले पाहिजे.
नविन वर्षात नव्या आशेने, नव्या उमेदीने नव्या संकल्पना घेऊन सकारात्मक राहून नव्या वर्षाचे स्वागत करु.मनामधे प्रेम,माया,जिव्हाळा,आपुलकी जपू माणुसकीचे नाते घट्ट करू, परोपकारी वृत्ती ठेवून सन्मार्गावर चालत राहू.हे नविन वर् सर्वांना सुखाचे, समृद्धी चे जावो व कुणाला कसली चिंता, दुःख न येवो हि ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा.
✒️लेखिका:-सौ अनुराधा रत्नाकर उपासे
मंगरूळ ता तुळजापूर
जि उस्मानाबाद.