भिमा कोरेगाव १ जानेवारी १८१८ चा रणसंग्राम हा ऐतिहासिक आहे. मुळात भारत देशात मनुस्मृती ची निर्मीती झाली आणि चातुवर्ण व्यवस्था उदयास आली हि चातुवर्ण व्यवस्था एवढी भयंकर होती की या वर्णव्यवस्थेने मानसा माणसा मध्ये भेद तर निर्माण केलाच उलट माणसाला मानसिक गुलाम बनवून, तर्क, चिकित्सा, विज्ञान आणि सत्य यापासून कोसो दूर ठेवले. आणि समाजामध्ये प्रचंड अंधश्रद्धा पसरवून दिली. म्हणुनच तर अस्पृश्य समाजाच्या स्पर्शाने विटाळ व्हायचा आणि गाईच्या मुत्राने पवित्र होण्याची संस्कृती रूजू झाली.
माणसाला हिन लेखुन पशुला पूजनीय माणणारी संस्कृती निर्माण होऊन माणसेच माणसाच्या मनावर विषमतावादी व्यवस्था निर्माण करायला खतपाणी घातले. जातीव्यवस्था मजबूत करून माणसाचे शोषण आणि जाती निर्माण करणाऱ्या लोकांचे पोषण सुरू होते. आपलीच सत्ता कायम रहावी म्हणून शिक्षण बंद करून अज्ञानामध्ये ढकलून देऊन मानवी गुलामांवर व गुलामांच्या विचारावर राज्य करू लागले. येथे जातीला व त्या जातीतील व्यक्तीला हिनतेची वागणूक देऊन त्यांचे सर्वच स्वातंत्र्य हिरावून घेतल्या गेले होते. पुरुषांची ही अवस्था होती तर महिलांची व्यवस्था यापेक्षा ही भयानक होती.
महिला ही वर्ण व्यवस्थेनुसार फक्त मुल तयार करून मनोरंजन करून घेण्याचे ती मशीन मानली गेली होती. मानवाशी अमानुष वर्तन करून स्वतः चे वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्था करत होती. भिमाकोरेगाव रणसंग्राम १८१८ हा एक युद्धाचा भाग नव्हताच, तर ज्या व्यवस्थेने माणसाला माणसापासून वेगळे केले आणि हीन दुय्यम वागणूक देऊन अमानुष हाल केले, अज्ञानात ठेवले, माणसिक गुलामगिरी लादून निसर्ग दत्त अधिकार हिसकावून घेतले. प्रवाहात येण्याची प्रत्येक संधी नाकारली आणि समाजात प्रचंड विषमता निर्माण केली हि सर्व व्यवस्था हानुन पाडण्याची संधी मिळाली आहे त्या संधीचे सोनं केले म्हणजे तो भिमाकोरेगाव चा रणसंग्राम होय.
भिमा कोरेगाव इतिहास व पार्श्वभूमी तपासणे महत्त्वाचे आहे. विषमतेने, जातीव्यवस्थेने बरबटलेल्या या देशात जाती निर्माण करणाऱ्याला, जातीचे संवर्धन करणाऱ्याला येथे महत्त्व दिले जाते आणि ज्यांनी जाती व्यवस्था, विषमता आणि पेशवाई नाकारली त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जातात. समतामेवर आधारित समाजव्यवस्था आजही पुरोगामीत्वाचा झेंडा मिरवणाऱ्या बेगडी लोकांना मान्य नाही. तथागत बुद्धांपासुन तर संत गाडगेबाबा बाबा पर्यंत समतावादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि समाजाती लोकांची मानसिक गुलामी तोडून त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून आपले आयुष्य खर्ची घातले.
तरीही आम्हाला त्यांचा विचार पटला नाही म्हणून आजही विषमतावादी व्यवस्थेची पिलावळ जिवंत आहे. मराठ्यांसोबत घातपात करून पेशव्यांनी आपली सत्ता निर्माण केली होती. पेशवाई म्हणजे निवळ मानवाला पशुतूल्य वागणूक व शोषण. पेशव्यांकडे ना नितीमत्ता होती ना न्यायीक भुमिका, पेशवे म्हणजे केवळ मानवी जिवनामध्ये जातीच्या विषाची फवारणी करून विषमतेची फळे निर्माण करणारी व्यवस्था. जन्मापासून ते मरेपर्यंत अनेक जाचक बंधनातून मानवाला निष्क्रीय करून मानवाचा वापर फक्त गुलामी करण्यासाठी केला जात असे. अन्याय अत्याचार सहन करण्याची क्षमता संपल्याने पेशवाई संपवण्यासाठी मनोमन सज्ज झालेली बटालियन म्हणजे महार बटालियन होय.
छत्रपती संभाजी राजेंची हत्या झाल्या नंतर पेशव्यांनी राजसत्ता स्वतः कडे घेतली व राज घराण्यातील लोकांवर देखिल शिक्षणाची बंदी घातली. अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर बंदी होती. सर्वच बंधने व गुलामीतून मुक्त होण्यासाठीच भिमा कोरेगाव घडवून आणल्या गेले. महार बटालीयन मध्ये बहुसंख्य महार असले तरी कमी अधिक प्रमाणात सर्वच जाती धर्माचे लोक होते. याचाच अर्थ भिमाकोरेगाव रणसंग्राम हा अन्याय व जाचक रुडी याच्या विरोधात होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनतर तर अन्याय अत्याचार वाढल्याने लोकांच्या मनामध्ये पेशव्याबद्दल द्वेष व बदल्याची भावना जास्त.जागृत होत होती. संभाजी महाराज यांची हत्या म्हणजे पेशव्यांचे कटकारस्थान होते. मनुस्मृती च्या नियमाप्रमाणे संभाजी महाराज यांची हत्या करण्यात आली होती.
त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करून फेकून दिले ही अपमानास्पद बाब काही लोकांच्या उरी लागली आणि संभाजी राजेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पेटून उठले.
डोक्यात अन्याय दूर करून आपल्या राजेंच्या हत्येचा बदला घेण्याचा हेतु असल्याने सर्वच जण फक्त संधीची वाट बघत होते. ती संधी सिद्धनाक महाराच्या नेतृत्वाखाली ३१ डिसेंबर१८१७ रोजी आली. २८००० पेशवे चाल करून येत आहेत सोबत घोडदळ व शस्त्र आहेत याची जाणीव असुन २८००० पेशव्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी महार बटालियन आपल्या ५०० शूरवीर योद्ध्यासोबत रात्री आठ च्या सुमारास उतरली. हि लढाई सत्ते साठी नव्हती तर अस्मितेसाठी होती, हि लढाई दोन शत्रुत नव्हती तर व्यवस्थे विरोधात होती, हि लढाई मान नाही तर स्वाभिमान जागृत करणारी होती, हि लढाई जिंकल्याने किताब नाही समता प्रस्थापित होणार होती.
हि लढाई होती राज्याच्या बदल्याची, ही लढाई होती सत्तेचा व संपत्तीचा माज असलेल्या लोकांना सत्याची जाणीव करून देण्याची. सांयकाळी आठ च्या सुमारास सुरू झालेली लढाई सकाळी आठ पर्यंत चालली. आणि लढाईमध्ये यशस्वी झाला स्वाभिमान, सन्मान आणि समता. ५०० शुरयोद्ध्यांनी २८००० हजार पेशव्यांना सपासप कापून टाकले. पेशवाई मिटवली आणि येण्याऱ्या पिढीला खुप मोठा संदेश दिला. तो म्हणजे संख्येने किती आहात हे महत्त्वाचे नसुन उपलब्ध असलेल्या क्षमतेचा ध्येयपूर्तीसाठी केला तर सपासप एका रात्री प्रत्येकी ५६ पेशवे कापता येतात. आणि तेव्हापासून पुढे म्हण पडली तुझ्या सारखे ५६ पाहिले.
एकेकाने ५६ चा खात्मा करून शौर्य व एकीची ताकद काय असते आणि तिचा वापर कुठे करावा याचा जागतिक संदेश म्हणजे ५०० शुरविर योद्ध्यांची यशोगाथा दाखवणारा आणि ब्रिटिशांनी महारांचा पराक्रम बघून जो स्तंभ उभारला तो स्तंभ आजही आम्हाला प्रेरणा आणि उर्जा देऊन, अन्याय आत्याचारा विरोधात ताठ मानेने स्वाभिमानी बाण्याने, विषमतावादी व्यवस्था संपवून समतावादी व्यवस्था निर्माण करून मानवाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले. भिमा कोरेगाव चा रणसंग्राम जातीच्या बंधनातून, मानुसकीला काळीमा फासणाऱ्या संस्कृतीतून मानवाला माणूस म्हणून स्विकार करून सन्मान करण्यासाठी चा होता. कमरेला झाडू आणि गळ्यात मडके लटकवून फिरताना काय मनाची अवस्था असेल त्या व्यक्तीची, माणूस असून माणसा सोबत मानुसकीचे संबध ठेवण्याची परवानगी नव्हती.
माणूस असून गुलामाचे जिवन जगावे लागणाऱ्यांनाच कळते काय असते गुलामी. आणि अशी परिस्थिती बदलण्यासाठी भिमा कोरेगाव घडत असते. म्हणून सार्थ अभिमान आहे ज्यांना बोलण्याचा, लिहण्याचा, वाचण्याचा, शिकण्याचा अधिकार नव्हता त्या लोकांनी पराक्रम घडविला आणी इतिहासाला प्रश्न पडला, शुरवीरांचे सर्वोच्च मानकरी ५०० यौद्धेच आहेत आणि त्यांच्या नावाचे भव्य स्मारक बांधून पराक्रम व स्वाभिमान सतत तेवत ठेवण्याचा संदेश दिला आहे. जगाच्या पाठीवर अनेक रणसंग्राम झाले ते सत्तेसाठी, न्याय हक्कासाठी झालेला रणसंग्राम फक्त भिमा कोरेगावच आहे. युद्धामध्ये दोन्ही बाजूने सारख्याच प्रमाणात मनुष्यबळ व शस्त्र यांचा वापर होऊन जवळपास सारख्याच प्रमाणात हाणी होत असते.
परंतु येथे मनुष्यबळ बघितले तर २८००० विरुद्ध ५००, २८००० हजारांकडे शस्त्र संरक्षित साहित्य आणी ५०० शुरविरांकडे हाती तलवार आणि छातीची ढाल होती. विषतावादी व अन्याय कारी व्यवस्थेमध्ये होरपळून मेल्यापेक्षा स्वाभिमान व समतेसाठी लढून मेलेले केव्हाही चांगले याच उद्देशाने लढलेल्या शुरविरांनी रातोरात २८००० अमानवी, अमानुष, अन्यायी लोकांचा खात्मा केला आणि खऱ्या अर्थाने हि लढाई शक्तीने नव्हे अन्याय सहन न करण्याच्या ताकदीने लढली म्हणून यशस्वी झाले. संभाजी राजेंच्या केलेल्या अमानुष हत्येचा बदला घेतला आणि छत्रपती संभाजी राजेंना मानवंदना दिली. म्हणून भिमा कोरेगाव चा रणसंग्राम हा आमच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा आहे. आणि या रणसंग्रामात अमानुष लोकांचा खात्मा करून अन्यायावर न्यायाने, विषमतेवर समतेने मिळवलेला विजय आहे.
याकडू उर्जा घेऊन आधुनिक पेशवाई आधुनिक पद्धतीने ठेचण्याची उर्जा घेऊन आजही समतेची व न्यायाची गरज आहे. त्याचीच उर्जा त्या क्रांती स्तंभापासुन घेतली तरच पाचशे शुरविरांना मानवंदना मिळेल आणि आपल्या रणसंग्रामाचे महत्त्व कळेल. ३१ डिसेंबर १८१७ रोजी सुरु झालेला रणसंग्राम १ जानेवारी १८१८ रोजी विजयाचा दिवस घेऊन निघाला म्हणून आमचे नवीन वर्षाची सुरवात विजयाने व पराक्रामाने होते. म्हणून शौर्यदिनांच्या व नविन वर्षाच्या मंगलमय सदिच्छा.
************************************
✒️लेेेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
************************************