६३ वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत

    49
    Advertisements

    ?निवडणूक आयोगाकडे झाली नोंद

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.31डिसेंबर):-ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की डोळ्यासमोर येते भांडण, तंटे, गट तट, वैमनस्य पण या सर्व गोष्टीला फाटा देत गेल्या त्रेसष्ट वर्षापासून मोहोळ तालुक्यातील अनगर व पंचक्रोशीतील ग्रामपंचायती शांततेच्या वातावरणात निवडणूका बिनविरोध करुन गावच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करुन घेण्याची तयारी सुरु होते. अनगरची ग्रामपंचायत स्थापन केल्यापासून स्व. लोकनेते बाबुराव आण्णा पाटील या निवडणूक बिनविरोध करण्याची उदात्त परंपरा चालू केली.

    ती आजही त्रेसष्ट वर्षापासून मा. श्री. राजन (मालक) पाटील यांनी चालूच ठेवली आहे. श्री. राजन पाटील यांचे सर्व जनतेशी स्नेहाचे व आपुलकीचे संबंध आहेत. त्याचबरोबर त्याचे पुत्र श्री. बाळराजे पाटील व श्री. अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनगर व शेजारील १२ वाड्याच्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्याची परंपरा कायम आहे. १९५२ पासून आजतागायत ग्रामपंचायतची नोंद देशाच्या निवडणूक आयोगाकडे बिनविरोध ग्रामपंचायत म्हणून आहे. आज गरज आहे, अनगर सारख्या ग्रामपंचायतीचा आदर्श घेवून निवडणूका बिनविरोध करण्याची.