✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293
सोलापूर(दि.23जानेवारी):- मध्य रेल्वे सोलापूर यांना केम तालुका करमाळा या रेल्वे स्थानक का जवळील रेल्व ब्रिज पुलाखालील रस्ता दुरुस्त करण्याबाबत व हैदराबाद मुंबई व चेन्नई मुंबई मेल एक्सप्रेस कायमस्वरूपी थांबा मिळावायासाठी निवेदन देण्यात आले त्यावेळी रेल्व प्रशासनाने आम्हाला तोंडी सांगितले आहे रस्ता की रेल्वे ब्रीजरस्ता वाहतुकीसाठी तात्पुरता दुरुस्त करून घ्यावा आणि 15 दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला रेल्वे उड्डाणपूल यासाठी रेल्वे एस्टिमेट काढून कलेक्टर ऑफिसला आणि तुम्हाला देऊ असे सांगितले आहे कोरोना काळा मध्ये काही स्टेशनचे स्टॉप बंद केले आहे.
ज्यावेळेस रेल्वे पूर्णपणे चालू होईल त्या वेळेस तुम्हाला थांबा मिळेल असे आश्वासन दिले आहेत इतक्या दिवसाच्या पाठपुराव्याला अखेर प्रहार संघटनेचे यश या वेळी सोबत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खलील भाई मनियार संपर्कप्रमुख जमीर भाई शेख करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर करमाळा संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार आणि गावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू ओहोळ युवा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.