?रोजगार संघ ब्रह्मपुरी तीव्र आंदोलन छेडण्याचे तयारीत.
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.9फेब्रुवारी):- जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर मध्ये ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांचा प्रस्ताव असून हा प्रस्ताव अतिशय चुकीचा आहे ब्रह्मपुरी शहर हे जिल्ह्यासाठी योग्य असून संपूर्ण सोयी सुविधायुक्त आहे ब्रह्मपुरी शहर उच्च दर्जाचे शिक्षण व आरोग्य साठी प्रसिद्ध असून येथे पाच जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक शिक्षण व वैद्यकीय उपचारासाठी येत असतात या ठिकाणी नगरपालिका उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय ,न्यायालय ,उपविभागीय , पोलीस अधिकारी कार्यालय ग्रामीण रुग्णालय सह अन्य खाजगी रुग्णालय व शासकीय तंत्रनिकेतन बांधकाम, सिंचन विभाग रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस व दूरसंचार कार्यालय इत्यादी सोयी उपलब्ध असून त्यांच्या विस्तारास जागा उपलब्ध आहे.
येथील लोकसंख्या व पायाभूत सुविधा व आंतर जिल्हा वाहतुकीच्या आधारावर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासूनच ब्रह्मपुरी नागभीड सिंदेवाही सावली तालुक्यातील जनता ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी करीत आहे या उलट चिमूर येथे उपरोक्त सोयींचा अभाव असून त्यांच्या विस्तारास वाव नाही तसेच रेल्वेच्या सोयीमुळे चिमूरच्या तुलनेत चंद्रपूर येथील कार्यालयीन कामे अत्यंत कमी खर्चात व कमी वेळात करणे शक्य होत आहे.
त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर मध्ये ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश केल्यास इथल्या नागरिकांवर प्रचंड अन्याय होईल व या अन्यायाच्या विरोधात संपूर्ण तालुक्यात संतापाची भावना निर्माण होऊन तीव्र आंदोलन पेटण्याची भीती आहे तेव्हा ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीचा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत आपल्या प्रस्तावाच्या विरोधात ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेच्या वतीने आम्ही आक्षेप नोंदवत आहोत त्यामुळे सदर प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अन्यथा या अन्यायाविरूद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रोजगार संघाद्वारे देण्यात आला.
निवेदन देताना ब्रह्मपुरी तालुका रोजगार संघाचे मार्गदर्शक प्रा. नामदेवराव जेंगठे सर, रोजगार संघाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मेश्राम , सचिव कुंदन लांजेवार, उपाध्यक्ष प्रज्वल वाघमारे सहसचिव शामसुंदर मंडपे , खुशाल वाकडीकर किशोर हलदार मयूर मेश्राम , आकांत मांदाडे , कर्नल वाकुडकर, सुरज तलमले, सुहास राऊत , अतुल नदेश्वर, अजय खळशिंगे, विवेक खरवडे , राजदीप मेश्राम, विकास मेश्राम ,श्रीकांत पारधी उदय पगाडे ,विनोद चौधरी, गौरव ठोंबरे व अन्य विठ्यार्थी उपस्थित होते.