अन्यथा मत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही – अतुल खुपसे-पाटील

    42
    Advertisements

    ✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

    सोलापूर(दि.24फेब्रुवारी):-कृषी वीज पंपाची वीज बील माफ न केल्यास महाआघाडीच्या मंत्यांभ ना सोलापूर जिल्याजकत फिरु देणार नाही असा इशारा शेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिला. राज्यामध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर गेली वर्षभरामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे सर्व जग एका जागेवर ठप्प् झाले होते. शेतकरी, कष्टकरी, यांना अर्धपोटी राहून या महामारीचा सामना करावा लागला होता. या काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा या सरकारने केली मात्र ही घोषणा त्यांची वाऱ्यावर सोडून दिली. आज सोलापूर जिल्ह्यासह करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती पंपाचे वीज बिल थकीत असल्याने कनेक्शन तोडण्याची मोहिम वीज वितरण कंपनीकडून सुरु आहे. हा मोघलाईशाहीचा कारभार त्वरीत न थांबल्यास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचे काम केले जाईल असा स्पष्ट इशारा शेतकरी नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिला.

    यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना अतुल खुपसे-पाटील म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांच्या कृषी मालाला भाव नाही. ऊस, केळी, कपासी, उडीद कांदा, या पिकासह भाजीपाला, यांना भाव नाही . बार्शी विभागामध्ये 1 लाख कृषी वीज कनेक्शन आहेत. तर जिल्ह्यामध्ये साडे तीन ते चार लाख कृषी पंप वीज कनेक्शन आहेत. या कृषीपंपाची थकीत वीज बिला पोटी सध्या वीज तोडणी मोहिम वीज वितरण कंपनीकडून सुरु आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून हा अन्याय दुर करण्यासाठी मी सर्व ताकदीनिशी कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेवून मैदानामध्ये उतरलो आहे. कर्जाच्या घाईत मरुन मेलेला शेतकरी त्याच्या विहिरीवरील वीज कनेक्शन तोडून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे काम हे सरकार करत आहे.

    लॉकडाऊनच्या काळातील सर्व वीज बील माफ करावे अन्यथा आम्हीं या सरकारच्या कोणत्याही मंत्याज्ला रस्यािसवर फिरु देणार नाही असा गर्भीत इशारापण अतुल खुपसे-पाटील यांनी दिलेला आहे. यावेळी त्यांच्या सोबत राणा वाघमारे, शरद एकाड, अतुल राऊत, दिपाली डिरे, बंडू शिंदे, किशोर शिंदे, बालाजी तरंगे, काका कोळी, अभिजित नवले, संतोष कांबळे, जयसिंग पाटील, नाना भोगल, महेश घरबुडे, काका घरबुडे, गणेश वैभासे, सोमा कातूरे, राहुल सावंत, सुभाष थोरात, कल्याण गवळी, तेजस गाडे, विठ्ठल कानगुडे, हर्षवर्धन पाटील, विजय खुपसे, भैय्या देवडकर आदि कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते.