महावितरण अधिकारी व कर्मचारी राबवीत असलेली विज देयक वसुली त्वरित थांबवा- प्रमोद खंडागळे

    51
    Advertisements

    ✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

    बुलढाणा(दि.25फेब्रुवारी):- कोव्हीड-१९ च्या आपात्कालीन स्थितीमुळे शासनाकसन २०२० मध्ये कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते ज्यात विमाने, रेल्वे व बस सेवा तसेच अन्य दळणवळण सुद्धा बंद करणायत आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोजगार बुडाला तसेच उद्योगधंदेही बुडाले होते आणि उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद होते ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. याकाळात महावितरणने ज्या धैर्याने सेवा दिली ती प्रसंशनीय आहेच.परंतु ग्राहकांचे उत्पन्नच नसल्यामुळे ते देयक भरणा करू शकले नाहीत हे सुद्धा सत्यच आहे. आता कुठे थोडेफार उत्पन्न हाताशी येत होते मात्र कोरोनाने पुन्हा डोके वर काढून परीस्थिती गंभीर बनण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.
    ग्राहकांच्या थकबाकी बाबत मा. आयोगाने महावितरणला सुलभ हप्त्यांद्वारे देयक भरणा सुविधा देण्याबाबत “ग्राहक हक्क विवरणपत्र” व “विज पुरवठा संहिता विनियम २००५” नुसार निर्देश सुद्धा दिलेले आहेत.

    तसेच कोरोना पार्श्वभूमीवर महावितरण मुख्यालयानेही वसुली परिपत्रक क्र. कार्यकारी संचालक(दे. व म.) थकबाकी वसुली/१९४०८ दिनांक- १३/११/२०२० नुसार थकबाकीचे सुलभ हप्ते करून देण्यास स्थानीय अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे. मात्र महावितरण स्थानीय अधिकाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौखिक आदेशाचा संदर्भ देऊन तथा सर्व कायदे, नियम व विनियम धाब्यावर बसऊन थकबाकीची वसूली सुरु केली आहे. ज्यामध्ये चुकीचे देयक दुरुस्त न करता, कोणतीही नोटीस न देता तसेच ग्राहक विनंतीकडे दुर्लक्ष करून थकबाकी देयकाचे हप्ते करून न देता विज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरु केला आहे.

    त्यामुळे चुकीच्या देयाकाबाबत ग्राहक विवाद बहुसंख्येने वाढणार असल्यामुळे ते महावितरण अधिकाऱ्यांनाही तसेच ग्राहकांनाही अजिबात हितकारक नाही याचा न्यायपूर्ण विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.वास्तविक ग्राहक आहेत तरच महावितरण चे अस्तित्व आहे आणि याकरिता महावितरण व ग्राहक यांच्यात समन्वय अति आवश्यक आहे. त्यामुळे महावितरणलाही वसुली मिळाली पाहिजे व ग्राहकांनाही विज मिळाली पाहिजे हे सूत्र दुर्लक्षित करून चालणार नाही. करीता देयक दुरुस्ती आणि त्याची सुलभ हप्त्यांद्वारे देयक वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे. यासर्व प्रक्रियेत देयाकापोटी आकारण्यात आलेले व्याजही ग्राहक भरणा करीतच असतो हे हि महत्वाचे त्यामुळे महावितरण साठी हे तोट्याचे तर अजिबात नाही.

    ह्याबाबत महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रमोद खंडागळे यांनी अधीक्षक अभियंता महावितरण बुलडाणा यांना दि.23 फेब्रुवारी 2020 रोजी ई मेलने व आज 25 फेब्रुवारी रोजी पोष्टाने निवेदन सादर करून बेकायदेशीररीत्या होत असलेली विज खंडित करण्याची कारवाई थांबविण्याबाबत व नियमांनुसार देयाकाचे हप्ते करून देण्याबाबत जिल्ह्यातील स्थानीय अधिकार्यांना त्वरित निर्देश द्यावेत ही विनंती केली आहे. याच्या प्रती प्रधान सचिव ऊर्जा विभाग, सचिव महाराष्ट्र विज नियामक आयोग, व्यवस्थापकीय संचालक महावितरण मुंबई, मुख्य अभियंता अकोला यांनाही मेलद्वारे सादर केल्या आहेत.
    ग्राहकहीतास्तव योग्य ती कार्यवाही न झाल्यास याबाबत संघटनेच्या वतीने मा.आयोगाकडे याचिका व महावितरण मुख्यालयाकडे तक्रार दाखल करण्यांचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.