15 वा वित्त आयोगातिल निधी खर्च करण्यात येऊ नये – भाजप नगरसेवकांचे विरोध

    62

    ?विरोधीपक्ष नगरसेवकांनी केली सभात्याग

    ?फेर निविदा काढण्याची मागणी

    ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

    बिलोली(दि.2मार्च):-तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील घनकचरा संकलनकामे 14 वित्त आयोग अंतर्गत केला जात असे पण 14 वित्त आयोग अंतर्गत निधी शिल्लक नसल्यामुळे सदर काम 15 वा वित्त आयोग अंतर्गत खर्च करण्यास मान्यता घेण्याचा ठराव दि. 23 फेब्रुवार रोजी संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक 10 ठेवण्यात आले होते.यास भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विरोध दर्शवून कुंडलवाडी शहरातील घनकचरा संकलन कामाचे 14 वित्त आयोग अंतर्गत निधी शिल्लक नसल्यामुळे सदर काम 15 वा वित्त आयोग अंतर्गत खर्च करण्यात येऊ नये अशा आशेचे लेखी निवेदन मुख्याधिका-यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले.

    की दि.23 फेब्रुवार 2021 रोजी सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक 10 बाबत विषयी विनंती करण्यात येते की , कुंडलवाडी शहरातील घनकचरा संकलन कामाचे 14 वित्त आयोग अंतर्गत निधी शिल्लक नसल्यामुळे सदर काम 15 वा वित्त आयोग अंतर्गत खर्च करण्यात येऊ नये कारण मागील निविदा प्रक्रिया चुकिचे झाल्याचे निर्देशनात आल्यामुळे ( 4 ) निविदे आले असता ( 4 ) निविदा न उघडता संबंधीतांना काम दिल्यामुळे सदरील कामे रद्द करुन नविन निविदा मागविण्यात यावी.

     असे सभागृहात सविस्तर विरोध दर्शविल्यानंतर आम्ही खालील सही करणार नगर सेवक नगर सेविका लेखी अर्ज देऊन सभा त्याग करीत आहोत.तरी नविन निविदा मागविण्यात यावी अशा आशयाचे निवेदन विरोधीपक्ष नगरसेवकातर्फे न.प.मुख्याधिकारी यांना देण्यात आले.यावर नगरसेवक अशोक पाटील, वानोळे,गंगाप्रसाद गंगोणे,पंढरी पुपलवार,नगरसेवीका अनिता पुपलवार,शेख रिहाना पाशामियाॅ आदींच्या स्वाक्ष-या आहे.