प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची तब्बल २५ पदाधिका-यांची उमरखेड तालुका कार्यकारिणी जाहीर

    48
    Advertisements

    ✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    यवतमाळ(दि.4मार्च):–प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाची उमरखेड तालुका कार्यकारिणी नूकतीच जाहीर करण्यात आली. संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, विदर्भ अध्यक्ष विजय बुंदेला यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, गजानन गंजेवाड कार्याध्यक्ष, संजय सल्लेवाड कोषाध्यक्ष, मोहण कळमकर युवा जिल्हा उपाध्यक्ष, उदज पुंडे जिल्हा संघटक मंत्री, गोपाल गौरवाड जिल्हा युवा संघटक यांच्या नेतृत्वाखाली संघाची उमरखेड तालुका कार्यकारिणी तयार करून जिल्हाध्यक्षांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

    प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची उमरखेड तालुका कार्यकारिणी अशी : मारोती गव्हाळे तालुका अध्यक्ष, सुनिल ठाकरे उपाध्यक्ष, कमलाकर दुलेवाड सचिव, हरीदास हिंगोलकर सहसचिव, मैनुद्दीन सौदागर कोषाध्यक्ष, नयुम शेख कार्याध्यक्ष, गजानन वानखेडे संघटक, विवेक जळके सहसंघटक, संदेश कांबळे सरचिटणीस, गजानन नावडे संघटक मंत्री, संजय जाधव सदस्य ,आनंद सुरोशे सदस्य, भागवत काळे सदस्य , अर्चना भोपळे सदस्य , बाबा लाला खान सदस्य , मारोती रावते सदस्य, विलास घोडे सदस्य, संदीप पेन्टेवाड सदस्य, राजू पिटलेवाड सदस्य, वसंता नरवाडे सदस्य, लक्ष्मिनारायण जयस्वाल सदस्य अशी तब्बल २५ पदाधिका-यांची उमरखेड तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केली असून तद्नंतर शेतीवर जाऊन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले व सर्व पदाधिका-यांनी शेतातील जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.