महावीर कलेक्शन व राजघराना कपड़ा दुकान संचालकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड

    53
    Advertisements

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाटपैलवान)मो:-9923451841

    हिंगणघाट(दि.४मार्च):-जिल्हाधिकारी देशभरतार यांनी दिलेल्या आदेशानुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन न करनाऱ्या दुकानांवरती कारवाई सुरुच आहे.आज शहरातील महावीर कलेक्शन तसेच राजघराना कपड़ा दुकान संचालकांना कोरोना पथकाने प्रत्येकि २ हजार दंडाची कारवाई केली.शहरातील पालिकेच्या कोरोनावनियंत्रण पथकाचेवतीने शहरात वीनामास्क बिनधास्त फिरणाऱ्या ३७० नागरिकांवर तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसायीक प्रतिष्ठानांवर कारवाईचा बडगा उगारने सुरु केले आहे.

    गेल्या दहा दिवसात अशाच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून हिंगणघाट नगरपरीबषदेचे कोरोना नियंत्रण पथकाने ६८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
    सदर कारवाई हिंगणघाट नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनात कोरोना नियंत्रण पथक प्रमुख अधिकारी प्रविण काळे, महेंद्र नक्के ,रऊफ खाॅ,रामदास तळवेकर, दिपक ठाकरे यांनी केली आहे