✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887
निफाड(दि.8मार्च):- माजी आमदार अनिल अण्णा कदम यांची खेरवाडी नारायणगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी भेट घेतली.
माजी आमदार अनिल कदम या भेटी प्रसंगी गावविकासाच्या विविध विषयांवर चर्चा झाली मा. आमदार अनिल अण्णा कदम यांनी शासन स्तरावर हवी ती मदत करण्यासाठी सदैव मी तुमच्यासोबत असेल व विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे कोणतीही कामे एकजुटीने होत असतात त्यामुळे गावविकासाच्या प्रसंगी सर्व नागरिकांनी सदस्यांनी एकत्र काम केले पाहिजे असे विचार आपल्या मनोगतात मांडले.
या प्रसंगी निफाड पंचायत समिती सभापती सौ.रत्नाताई शंकरराव संगमनेरे, जि.प.सदस्य दिपकभाऊ शिरसाठ, खेरवाडी सरपंच अश्विनी दिपक जाधव, उपसरपंच विजय लांडगे, सदस्य सोपानराव राजाराम संगमनेरे,कैलास निवृत्ती संगमनेरे,उमेश वसंत पगारे,रक्षा पप्पू उगले, उषा किसन लांडगे,विमल भाऊसाहेब निपुनगळे,ग्रामस्थ तानाजी जाधव, तानाजी संगमनेरे, सतीश संगमनेरे, विजय नागरे, रामनाथ संगमनेरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते