✒️जयदीप लौखे-मराठे,वेल्हाणे(धुळे प्रतिनिधी)
धुळे(दि.8मार्च):- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नूतन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणनाना शिंदे व जळगांव निरीक्षक डॉ. सुवर्णाताई शिंदे यांच्या हस्ते नूतन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
काही ठिकाणी जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन व मोर्चेबांधणीच्या कामाला लागावे, असे आवाहन यावेळी जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी केले.
यात जिल्हा उपाध्यक्षपदी प्रितम देशमुख, साक्री तालुकाध्यक्षपदी रोहिणी कुवर, शिरपूर तालूका उपाध्यक्षपदी हर्षदा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरणनाना शिंदे, जळगांव निरीक्षक डॉ. सुवर्णाताई शिंदे, जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जिल्हा कार्याध्यक्षा मालती पाडवी यांच्यासहराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते