✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)मो:-7038121829
नेरी(दि.15मार्च):- नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील सामाजिक कार्यकर्ते व महानुभाव पंथीय विचारांचे प्रचारक व प्रसारक रमेशजी गणवीर (कै. राजधरदादा कारंजेकर) यांचे प्रथम स्मृतीदिनानिमीत्य पुरस्कार वितरण तथा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात आला होता.
या प्रसंगी कै. राजधरदादा कारंजेकर सेवा समिती चे अध्यक्ष दिपक गणवीर, सचिव निता रामटेके, विलास रामटेके, ज्ञानेश्वर हेमने, संतोष रामटेके तसेच विदर्भातील अनेक मंडळी आनलाइन स्वरूपात सहभागी झाली होती. या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रसारण सर्वज्ञ विचार वाहिनीवरुन करन्यात आले होते
कै. राजधरदादा कारंजेकर सेवा समिती हि येणाऱ्या काळात या विभागात गोर गरिबासाठि मोठ्या प्रमाणावर वैद्यकिय व्यवस्था उपलब्ध करुन देनार असल्याचा मानस समिती तर्फे व्यक्त करन्यात आला.
समितीच्या वतीने या वर्षी दिला जानारा कै. राजधरदादा कारंजेकर स्मृती पुरस्कार महानुभाव तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. किशोर शेंडे व महानुभाव विचारांचे प्रसारक मधुकरदादा उर्फ महंत अळजापुरकर बाबा यानां प्रसिद्ध साहित्यिक, कवी तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. भुपेश वामनराव पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ सन्मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.