नायगाव तालुक्यातील निम्न मानार प्रकल्पाच्या कालव्यावरील पूल व गेटची दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी देऊन निधी द्यावा

    48
    Advertisements

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.16मार्च):- नायगाव तालुक्यातील निम्न मानार प्रकल्पाच्या कालव्यावरील पूल व गेटची दुरूस्ती व नवीन बांधकामासाठी जलसंपदा विभागाचा निधी देऊन ही कामे लवकरात लवकर करावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे दिली.

    वरील कामसंदर्भात वसंत सुगावे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करत आहेत.काल मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा. ना .जयंत पाटील यांना भेटून या कामांना लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली. यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सदरील कामे विशेष बाब म्हणून मंजूर करून या कामंना तात्काळ निधी देण्यात यावा याबाबत जलसंपदा विभागाला आदेश दिलेत.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख,प्रदेशकार्याध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नांदेड जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम हे उपस्थित होते.

    यामध्ये (1)लालवंडी-नायगाव रस्त्यावरील पूल (2)घुंगराळा-नवीन तहसील रस्त्यावर मौ.पळसगावाजवळ एक पूल(3)मौ.टाकळगाव येथे एक पुल(4)नायगाव- उमरी राज्य रस्त्यावर मौ.कुंटुरजवळ एक पूल (5)नायगाव- उमरी राज्य रस्त्यावर मौ.इकळी जवळ एक पूल (6) मायनर व आऊटलेट गेट शाखा कालवा १ वर 14 गेट( 7)घुंगराळा येथील पाटबंधारे वसाहतीत कर्मचारी निवास गाळ्यांची दुरुस्ती व अंतर्गत रस्ता (8)घुंगराळा येथील पाटबंधारे विभागाच्या बिनतारी संदेश यंत्रणा(Wireless) इमारतीची दुरुस्ती करणे या कामांचा समावेश आहे.