✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७
हणेगाव(दि.20मार्च):- येथील मासिक सभा होणार असल्यामुळे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यासमोर अनेक प्रश्न असून गावातील कामाच्या समस्येचा निपटारा व विविध विकास कामाचा आढावा व गावातील मंजूर झालेले घरकुल व अपंगासाठी योजना आणणे. हुतात्मा स्मारकामध्ये वाचण्याची सुविधा निर्माण करणे, हुतात्मा स्मारकावर होणारे अतिक्रमण काढणे, सिमेंटच्या खुर्च्या तयार करणे, गावातील लाईटची व्यवस्था व दुरुस्ती करणे,आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेने कोरोनाचे नियम न पाळल्यास दंड लावणे,सॅनिटायझर मशीन बसवणे आणि समित्या स्थापन करण्यावर भर देऊन तात्काळ विकासकामे करणे या विषयी चर्चा करण्यात आली.
तर यावेळी मासिक सभेचे अध्यक्ष हणेगावचे सरपंच सौ.वैशाली विवेक पडकंठवार यांनी गावातील स्वच्छतेवर अधिक भर देण्यावर सक्तीने विचार केले जाईल व यासाठी आम्ही सर्व महिला सदस्य एकत्र येऊन काम करणार असल्याचे सांगितले.यावेळी ग्रा.पं.सदस्य उमाकांत पंचगले यांनी गावातील कचरा चिखल दगड यांचे योग्य नियोजन करण्याची सूचना मांडल्या शेवटी सर्वाचे आभार उमाटे बी.जी. ग्रामविकास अधिकारी यांनी मांडले. यावेळी सरपंच सौ. वैशाली विवेक पडकंठवार, उपसरपंच मुजिबोदीन चमकुडे, दिलीप बदंखडके, विवेक पडकंठवार, माया राठोड, पूजा बत्तीनवार, उमाकांत पंचगले, हुरमतबेगम चमकूडे ,शालुकाबाई चेलवे,शिवाजी राठोड व सर्व सदस्य उपस्थित होते.