?हणेगाव उपकेंद्र अंतर्गत साडेचार हजार धारकाकडून येणार 88 लाख रूपये थकबाकी
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७
हणेगाव(दि.20मार्च):- विभागामध्ये थकबाकी वीज बिल वसुलीला जोरदार सुरुवात झाली असून,महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून शिल्लक असलेली विज बिल थकबाकीदारांकडून मार्च अखेरच्या महिन्यांमध्ये थकबाकी वसुलीला सुरुवात झाली असून यामध्ये वीज धारक हा विजबिल न भरल्यामुळे त्याचे वीज कनेक्शन तात्काळ कट करण्यात येत असून हाणेगाव विभागामध्ये हाणेगाव विद्युत केंद्राच्या अंतर्गत किमान 20 ते 25 गावे असून यामध्ये हणेगाव,कोकलगाव,रमतापुर,शिळवणी बिजलवाडी,येडूर,कुमारपल्ली,कामाजीवाडी,लोणी, धनगरवाडी,खुतमापूर,वझर, गाव व तांडा यांचा सहभाग असून या विभागांमधील विज बिल धारकांची संख्या किमान साडेचार हजार असून यांची थकबाकी किमान 88 लाख रुपये च्या घरामध्ये आहे.
ही बाकी तात्काळ वसूल करण्यासाठी येथील विद्युत महामंडळांचे कनिष्ठ शाखा अभियंता बोयावार जी.डी. आणि पतंगे एस.टी. व इतर कर्मचारी या कामांमध्ये व्यस्त झाले असून विज बिल धारकांनी या महिनाअखेरपर्यंत सर्व बिल महावितरण कंपनी कडे भरणा करावे असे सांगण्यात येत आहे.
या विभागातील विजधारक घरगुती वाणिज्य उद्योगासाठी देण्यात येणारे वीज बिल धारक यांच्याकडून 88 लाख रूपये थकबाकी तर वीस लाख चालू डिमांड थकबाकी असून या विभागातील शेतकऱ्यांनी तात्काळ बिल भरावे असे सांगण्यात येत आहे,पण कोरोना महामारी च्या या लॉकडाउन चक्रामध्ये सापडलेल्या जनतेकडून वीज भरणे कठीण झाले असून पुन्हा दुसऱ्या लाटेमध्ये लागलेल्या लाकडाऊनमुळे गावातील शेतकऱ्यांचे हाल होत असून त्यांना उदरनिर्वाहासाठीचे साधन नाही, हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. यामुळे थकब