(आंतरराष्ट्रीय जल दिन)
जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये दि.२२ मार्च १९९२ रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण व विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. आज जगात पाण्याचे संकट चालू आहे. असा एकही प्रदेश नाही जेथे पाण्याची आवश्यकता नाही. आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. पुढील महायुद्ध हे फक्त पाण्यासाठी होईल, असं तुम्ही कित्येकदा ऐकले असाल. मानव पाण्याचे महत्त्व विसरत आहे. त्यामुळेच आज पाण्याचे संकट सर्वांसमोर आहे. त्याचे महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने जागतिक जल दिन – वर्ल्ड वाटर डे साजरा करण्यास सुरूवात झाली. दरवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते. त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात. दि.२२ मार्च १९९३ रोजी संयुक्त राष्ट्रांनी आपल्याकडे असलेल्या गोड्या पाण्याचे महत्त्व लोकांना कळावे म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. शुद्ध, स्वच्छ आणि कायमस्वरूपी पाणी मिळणे, हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे.
आजही खुपशा भागांमध्ये अनेक लोकांना त्यांच्या घरात, गावांमध्ये, शाळांमध्ये पुरसे पाणी मिळत नाही. रंग, जात, लिंग, स्त्रिया-मुले, निर्वासित, दिव्यांग, श्रीमंत-गरीब, अल्पभूधारक अशा भेदभावामुळे हे लोक पाण्यापासून वंचित राहतात. निर्णय प्रक्रियेमध्ये या लोकांचा आवाज ऐकला जावा, म्हणून दरवर्षी पाणी बचतीबाबत विषय ठेवला जातो.
कारण ते सर्वांसाठी आहे. त्या संबंधित विविध विषय, समस्या यांची ओळख व्हावी. म्हणून दरवर्षी एका विषयाची निवड केली जाते. त्या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या उपक्रम, कार्यक्रम आणि स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. अनेक देश आता हा दिवस साजरा करू लागले आहेत. “दी वर्ल्ड हॅज इनफ फॉर एवरीवन्स नीड, बट नॉट इनफ फॉर एवरीवन्स ग्रीड.” असे महात्मा गांधीने म्हटले आहे. त्याप्रमाणे आपली पाण्याची गरज नेमकी किती आहे? हे ओळखण्यासाठी कृती करून बघा – सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला कोणकोणत्या कामाला पाणी लागते? आणि ते किती लागते? ते मोजताना एका ठराविक एककाचा वापर करा. जसे – बादली, मग किंवा १ लीटरची बाटली. आपल्या कुटुंबीयांसोबत याबद्दल चर्चा करून बघाच. दरवर्षी भारतात रंगपंचमीला हजारो लिटर पाणी एकमेकांवर एक परंपरा व मौज-मस्ती म्हणत रिचवले जाते. आवश्यकता नसतानाही ते पाणी वाया दवडले जाते. याची थोडी थोडकी माणुसकी म्हणून तरी गय करण्यात काय हरकत आहे.
कोरडे रंग वा गुलाल उधळल्यास आपण सहजच तेवढ्या हजारो लिटर पाण्याची बचत करू शकतो. पाच दिवसाच्या पाणी नासाडीला आपण रोखण्यास समर्थ ठरू शकतो. अंघोळीचे शौचालय, हातपाय धुतलेले पशुपक्षी, भाजीपाला धुतलेले झाडेझुडपे यांच्यासाठी वापरू शकतो. म्हणजेच त्याचा पुनर्वापर करूनही त्याची समस्या काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो, हे निश्चित!सन १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महासभेत हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत दररोज गाड्या धुण्यासाठी ५० लाख लिटर पाणी खर्च होते. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पाईप लाईन खराब झाल्यामुळे १७ ते ४० टक्के पाणी वाया जाते. अनेक ठिकाणी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अंदाजे ६-७ किमी प्रवास करावा लागतो. पृथ्वीवर ७० टक्क्यांहून अधिक पाणी आहे. पण गोड्या पाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. ९७.३ टक्के पाणी हे क्षारयुक्त आहे, जे पिण्यास योग्य नाही. ब्रश करताना नळ चालूच ठेवला तर पाच मिनिटांत सुमारे २०-२५ लिटर पाणी वाया जाते. जगातील २० टक्के लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज पिण्यासाठी ३ लिटर पाण्याची आणि जनावरांना ५० लिटर पाण्याची आवश्यकता असते.
पृथ्वीवर येणाऱ्या सर्व वनस्पतींचे मानवांना पाणी मिळते. एक किलो गहू उगवण्यासाठी एक हजार लिटर आणि एक किलो तांदूळ उगवण्यासाठी चार हजार लिटर पाण्याची गरज असते. अशाप्रकारे आपल्या जीवनात पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. पाण्यासंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कल्पना कदाचित आपल्याला नसेल. मात्र, वेळीच पाण्याचं महत्त्व जाणल्यास भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही. यंदाचा दुष्काळ, लक्षात घेता पाणी सर्वांना उपलब्ध होण्यासाठी आपणही हातभार लावूया.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक जल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
✒️लेखक:- संकलन व शब्दांकन – श्री निकोडे कृष्णकुमार जी.
(जिल्हा प्रतिनिधी – रयतेचा वाली)मु. पो. ता. जि. गडचिरोली. व्हा. नं. ७४१४९८३३३९.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com