आष्टी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळे बांधकामाची उच्च स्तरीय निष्पक्ष चौकशी करण्यात यावी

    49
    Advertisements

    ✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    आष्टी(दि.13एप्रिल):- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पं.स.अंतर्गत येणाऱ्या आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2019-2020 या कालावधीत गाळे बांधकाम करण्यात आले परंतु सदर बांधकाम करताना कोणत्याही प्रकारचे ई-टेंडरींग काढण्यात आलेले नाही.तसेच गाळे बांधकाम ईस्टीमेट (मोजमाप पुस्तके) मध्ये प्रत्येक बांधकाम चार भिंतीचे दाखविण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्ष बांधकाम हे तीन भिंतीचे करण्यात आले कारण प्रत्त्येक रुममध्ये एक भिंत कॉमन आहे. तसेच सदर गाळे धारकाकडून बोली लिलावानुसार रक्कम घेण्यात आली.

    रक्कम आजच्या स्थितीत ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यात शिल्लक नसल्याने सदर रकमेचा अपहार झाल्याची दाट शंका उपस्थित होत आहे. सदर बोली धारकाकडून ईस्टीमेटनुसार सदर रक्कम खर्च वजा जाता उर्वरीत रक्कम ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यात जमा असायला हवी होती परंतु असे झालेले दिसुन येत नाही.सदर पैसा कुठे खर्च झाला हे एक कोडेच आहे. त्यामुळे सदर गाळे बांधकामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    सदर बांधकामाची व बोली धारकांच्या रकमेची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा दोषींवर योग्य कारवाई व निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच सदर प्रकरण जनहित याचिका म्हणून न्यायालयात सादर करण्यात येईल. असे एका पत्रकाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री राहूल भगवान डांगे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.आष्टी ग्राम पंचायतच्या वतीने बांधण्यात आलेल्या गाळे बांधकामातील अफरातफर बाबतीत गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात खमंग चर्चा असून या प्रकरणात आणखी कुणाचा आशीर्वाद आहे, हे चौकशी अंती पुढे येणार आहे.संबंधित सचिव व सहभागी सहकारी यांच्या व्यक्तिगत संपत्तीची चौकशी केल्यास बरेच मोठे घबाड उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा चौका-चौकात सुरू आहे.