Advertisements
✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)
हिंगणघाट(दि.६मे):-शहरातील ख्यातनाम कव्वाल,सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार सरवर जानी यांचे आज दि.६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सरवर जानी विदर्भातील ख्यातनाम कव्वाली गायक म्हणून ओळखले जात असून आंबेडकरी कव्वाली गायक म्हणून ते ओळखले जात होते.
मृत्युसमयी त्यांचे वय ६९ वर्षाचे होते,त्यांचे नंतर त्यांचे मागे दोन विवाहित मुले तसेच दोन विवाहित मुली नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.त्याचे मृत्युमुळे शहरातील संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांच्या अनेक चाहत्यांमधे शोककळा पसरली आहे.