भिक्खू संघाला सढळ हस्ते दान करा

    61
    Advertisements

    कोरोनाच्या महामारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे, यामुळे हात मजुरी करून पोट भरणाऱ्या असंघटित कष्टकरी कामगारांची उपासमार होत आहे. त्याच बरोबर बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या भिख्खूनां लॉक डाऊन मुळे कुठेही फिरता येत नाही.त्यामुळे त्यांना कोणी भोजन दान करण्यासाठी घरी बोलावत नाही, आणि दान पण देत नाही अशा परिस्थितीत त्यांनी कसे जगावे ही मोठी समस्या निर्माण होत आहे. म्हणूनच समाजातील दानशूर उपासक उपसिकांनी भिक्खू संघाला सढळ हस्ते दान करावे.आणि मैत्री भावना वाढवावी अशी विनंती करीत आहोत.

    आपण बघतो आहोत की कोरोना मुळे धडधाकट माणसं मृत्यू मुखी पडत आहेत,त्यात धम्म कार्य करीत असलेल्या भिख्खूचे कुठे नां कुठे दुःखद निधन होत आहे.तर काही ठिकाणी भिख्खू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत,त्यांची उपासमार व औषध उपचार मिळत नसल्यामुळे, अनेक भिख्खू आजारी आहेत. दररोज सोशल मीडियावरील कोणत्या तरी ग्रुप मध्ये आपण त्यांच्या निधनाची वार्ता वाचत असतो. बरेच काही आपल्याला त्यांच्या आरोग्या विषयी वाचायला मिळते आहे. पण कोणत्याही ग्रुप मध्ये भिक्खू संघाला सढळ हस्ते दान करा,अशी पोस्ट कोणी करत नाही. घरादाराचा कुटूंबाचा त्याग करून ही माणसं भिख्खू बनून धम्म प्रचार,प्रसार करण्यासाठी गांव गांव फिरत असतात.त्यांच्या विषयी धम्म उपासक उपासिकांनी हितचिंतकानी बुद्धांची मैत्री भावना दाखवली पाहिजे त्यासाठी भिक्खू संघाला सढळ हस्ते दान करा.

    आपण आपल्या धम्म कार्य करणाऱ्या भिख्खूनां काहीही योग्य ती अन्न धान्य ,वस्तू स्वरूपात दान करून शकता.
    आज आपले चिवरधारी महान त्यागमूर्ती,धम्मप्रचारक, भिख्खू,भिख्खूणी आहेत,म्हणूनच धम्म जीवीत आहे.आणि त्यांच्यामुळेच कायम धम्म जीवीत राहाणार आहे. बाकी कोणत्याही बीना चिवरधारीमुळे चारकामुळे धम्म जीवित राहणार नाही.श्रध्दावान,दानशुर धम्मवान उपासक जागरूक मानव म्हणून आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे की आपल्या शीलवान, विनयशील,साधक,धम्मप्रचारक भिख्खू व त्यांच्या भिख्खू संघाची आपल्याला खूप खूप काळजी घेणे आवश्यक आहे.ज्या कोणत्याही परिसरात आपले धम्म प्रचारक भिख्खू राहात असतील तीथे जाऊन किंवा त्यांना फोन करून त्यांना नेहमीच विचारीत राहाणे. त्यांची चौकशी करणे हे आपले सर्वाचेच कर्तव्य आहे.त्यांना कशाची आवश्यक आहे हे आपणच समजून घेऊन त्यांना ती सेवा देण्याचा सर्वानी यथाशक्ती प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या परिसरात जिथे कुठे भन्तेजी असतील आणि आपणास तीथे जाणे शक्य होईल तीथे त्यांना ती सेवा देण्याचा सर्वानी प्रयत्न करावा.

    त्यांना सेवा देण्यासाठी आपण कायम तत्पर राहावेत, आणि आपल्याला मिळालेल्या, उपलब्ध झालेल्या ह्या महान अतुलनीय,अनंत, अमर्यादित अश्या महान धम्मदानाच्या संधीचा पुर्णपणे उपयोग घेऊन आपले कुशल कम्म करण्यासाठी,आपल्या पारमिता वाढवण्यासाठी,कायमचे आपण प्रयत्नशील राहावेत. कारण आपल्याला प्रत्येक भन्तेंजींची माहिती मिळत नाही ना म्हणून,आपण त्यांच्या पोस्ट टाकण्यापेक्षा तिथल्या परिसरातील विहारात असणाऱ्या भन्तेजी ना विचारावे कोणत्या भन्तेंजींना कशाची आवश्यकता आहे?. आपण त्याच्या करीता काय करू शकतो?. काय केले पाहिजे?. कशी आणि कुठे सेवा देऊ शकतो?.आपण देऊ शकत नसलो तर आपल्या मित्रांना सांगून भिख्खू संघाला सढळ हस्ते दान करण्याचे आवाहन करू शकतो.आपल्या सर्व धम्म प्रचारक भिख्खू संघांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सर्व आजारातून मुक्ती मिळावी,ही मंगल कामना करून रोज त्याच्यां करीता आपण सर्वजण मंगलमैत्री करावी.

    ✒️लेखिका:-धम्म सेविका प्रणाली बागडे ७२०८३०४७१२.लोकधारा कल्याण,जिल्हा-ठाणे