?कोरोणा महामारित काळाची गरज ओळखून वंचित चे विशाल भैया धिरे व पत्रकार नवनाथ पौळ यांनी राबविला महाराष्ट्र कोव्हिड सेंटरला फळवाटप ,अल्पोहाराचा कार्यक्रम
✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो-8080942185
केज(दि.11मे):- तालुक्यातील बनसारोळा येथे अॅड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून दि 10 मे रोजी वंचित बहुजन आघाडी चे विशाल भैया धिरे व पत्रकार नवनाथ पौळ यांनी विविध उपक्रम राबवून बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस साजरा केला.आज संपूर्ण जग कोरोणा सारख्या महामारिने त्रस्त आहे त्यातल्या त्यात भारतात आलेल्या दुसर्या लाटेमुळे समाज हैराण झाला असून भयभित असून देशात लाखो पेशंट नव्याने सापडत आहेत तर काही दगावत आहेत. यि महामारिशी दोन हात करण्यासाठी येथील आरोग्य यंत्रणा व प्रशासन पुर्णपणे झोकून काम करत आहेत.
अशीच सामाजिक बांधिलकी व काळाची गरज लक्षात घेऊन वंचितचे विशाल भैया धिरे व पत्रकार नवनाथ पौळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र कोव्हिड सेंटर बनसारोळा येथील कोव्हिड रूग्णांना फळ, अल्पोपहार,पाणीबाॅटल,व मास्क आणि सॅनिटायझर वाटप करूण अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने एक सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी केज तालुका संघटक विशाल भैया धिरे व पत्रकार नवनाथ पौळ, पत्रकार राजकुमार धिवार,प्रशांत धिरे सर,दिपक धिरे, जितेंद्र बल्लाळ, प्रविण आदमाने, राहुल गायकवाड यांच्यासह सदरील कोव्हिड सेंटर चे व्यवस्थापक विजय काकडे सर,सेंटरचे इन्चार्ज डॉ.कावळे सर ,गोरे मॅडम व इतर कर्मचारी व आरोग्य कर्मचारी स्टाफ गोविंद गुळभिले,संदिप वाघमारे,प्रविण आडागळे,सविता शेळके,विनंता सुरवसे, आकाश गोरे,संकेत आपटे,सिमा माळी व बनेश्वर शिक्षण संस्थेचे सौ.मोरे .एस.एम,सौ.जगताप मॅडम,श्री.नाईकवाडे सर व इतर कर्मचारी उपस्थित होते