✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)
हिंगणघाट(दि.११मे):-अवैध दारुची वाहतुक तसेच विक्री प्रतिबंधित करण्याचे उद्देशाने हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत उपविभागात विशेष दारुबन्दी अभियान राबविण्यात आले.सदर अभियाना अंतर्गत दि .10 मे रोजी मिळालेल्या माहीतीचे आधारे नागपुर ते चंद्रपुर जाणाऱ्या मार्गावरिल मौजा धगडबन पाटी येथे हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयाचे पथकाने सापळा रचुन वाहन क्र . MH – 26 / AK- 9707 मोठया शिताफिने अडविले.
यावेळी दारूवाहतुक करणाऱ्या कार चालकाने घटनास्थळावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिस पथकातील पोलिसांनी आरोपीला मोठया शितापिणे जेरबंद केले.
सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात देशी दारूने भरलेल्या 90 एमएलच्या 100 खोक्यात एकुण 10 हजार शिश्या एकूण 5 लाख रूपये तसेच वाहन क्र . MH – 26 / AK- 9707 किंमत 10 लाख रूपये असा एकुण 15 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदरप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या कारचालकाची पियुष माणीक माणुसमारे (32) अशी ओळख पटली असून तो आजाद वार्ड,वरोरा येथील रहिवासी आहे.
सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेली मोटरकार तसेच जप्ती करण्यात आलेला दारूसाठा समुद्रपुर पोलीसात जमा करण्यात आला असून आरोपीवर दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंखे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक रामटेके, पो ना चेतन पिसे, पो.हवा. शेखर भटेरो, सतीश घवघवे, अश्विन सुखदेवे, पो.शी. प्रेमदेव सराटे इत्यादींनी केली