✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)
चिखली(दि.22मे):-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष मोठ्या प्रमाणावर उभारण्याची गरज आहे. आज मौजे सवणा व मौजे ईसोली येथे विलगीकरण कक्षांचे उद्घाटन केले. अशा विलगीकरण केंद्रांमुळे कोरोना रुग्णांना गावातच आयसोलेट करून रुग्णांच्या कुटुंबीयांना संसर्ग होण्यापासून रोखता येणार आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त होतील.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ सिंधुताई तायडे, जिल्हा परिषद सदस्य मा श्री शरद नाना हाडे, उपसभापती मा शमशाद पटेल, मा नासेर भाई सौदागर, पंचायत समिती सदस्य प्रा वीरेंद्र वानखेडे, डॉ भाजप तालुकाध्यक्ष श्री कृष्णकुमार सपकाळ, श्री किशोर जामदार, सरपंच श्री सुनील शेळके, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री भारत भाऊ शेळके, तालुका सरचिटणीस श्री विनोद सिताफळे, सरपंच सौ सत्यभामा सुरडकर, गट विकास अधिकारी श्री जाधव साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री हिवाळे साहेब, सौ विद्याताई देव्हडे, उपसरपंच श्री अनुरथ भुतेकर, कय्युम शाह, श्री विठ्ठल देव्हडे, श्री रवि शिरसाट, श्री सतिश नवले, सौ संगिता ताई हाडे, सौ कल्पनाताई हाडे,सौ मालताबाई एखंडे, सौ पार्वती सोलाट, सौ ऊर्मीला थोरात, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.