✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)
परळी(दि.28मे):- येथील पंचायत समितीचे वाहनचालक रमेश नागरगोजे यांचे आज गुरुवार दि.27 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यसमयी ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पंचायत समितीचे वाहनचालक रमेश नागरगोजे मुळचे नागदरा येथील रहिवासी होते. सध्या ते कंडक्टर काॅलनीत राहत असत. सर्व परिचित व सुस्वभावी म्हणून त्यांची ओळख होती. मागील महिनाभरापुर्वी त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सकाळी त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पंचायत समिती मंदिर सुस्वभावी,संयमी व्यक्तीमत्व म्हणुन ते परिचित होते.त्यांच्या निधनाने पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी व अधिकारी, कर्मचारी व मित्रपरिवारातून शोकभावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या निधनाने नागरगोजे कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खात दै. परिवार सहभागी आहे.