✒️विषेश प्रतिनिधी(समाधान गायकवाड)
अंबाजोगाई(दि.३जुन):- अंबाजोगाई शहरात मान्सूनपूर्व नाले साफ सफाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन प्रभारी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी यांना लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने देण्यात आले सध्या महाराष्ट्र शासनाने असे भाकीत केले आहे की यावर्षीचा पर्जन्यमान सरासरीपेक्षा एकशे एक टक्का होणार आहे.
त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सखोल भाग असल्यामुळे नाल्या तुंबल्या नंतर काही भागात भागातील रहिवासी एरियात घरात पाणी घुसते त्या अनुषंगाने शहरातील त्यात विशेष करून दलित व मुस्लीम बहुल एरियात जास्त प्रमाणात नाल्यातून पाणी वाहते त्यामुळे दलित व मुस्लीम बहुल एरियामध्ये तात्काळ नालेसफाई करण्यात यावी.
या आशयाचे निवेदन लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने आज दिनांक ०३ रोजी प्रभारी नगराध्यक्ष श्री राज किशोर पापा मोदी यांना देताना लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेश भाऊ वाहुळे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख मोहम्मद ताहेर भाई विराज धीमधीमे लोजपा तालुकाध्यक्ष अशोक भाऊ काळे आदित्य भैया चौरे विशाल भाऊ सोनटक्के व इतर.