कवयित्री सविता झाडे-पिसे यांची झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर महिला संघटकपदी निवड

    49
    Advertisements

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

    चिमूर(दि.27जून):-पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिला साहित्यिकांनी या भागात बोलली जाणारी बोलीभाषा अवगत करून या बोलीभाषेतून लेखन व्हावे आणि ह्या भाषाचे संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी आभासी प्रणालीद्वारे चर्चा करण्यात चंद्रपूर जिल्हा महिला समिती गठित करण्यात आली.

    यामध्ये चिमूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री सविता झाडे-पिसे यांची चंद्रपूर महिला संघटक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.आजपर्यंत त्यांनी विविध विषयावर लेखन केले असून त्यांचा प्रभात कवितासंग्रह प्रसिद्ध आहे .जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, प्रा.डॉ. धनराज खानोरकर , अरूण झगडकर, प्राचार्य रत्नमाला भोयर, अॕड.सारीका जेणेकर यांनी अभिनंदन केले.