नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्या-रिपाई (आठवले)उत्तर महाराष्ट्र शाखेची मागणी

    44
    Advertisements

    ✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

    नाशिक(दि.२८जून):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राज्य नेते तसेच नाशिक जिल्हाप्रमुख मा.प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी आज नाशिकचे कलेक्टर श्री. सूरजजी मांढरे यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले.

    नाशिकचे भूमिपुत्र तसेच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानव मुक्ती आंदोलनातील सरसेनानी भूमीहीन सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन नाशिकचे माजी खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाशिक विमानतळास (ओझर मिग)नांव मिळावे अशी मागणी करण्यात आली.

    निवेदन देते वेळी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मंदन आण्णा शिंदे, युवा नेते सुरेशभाऊ जाधव,युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे, युवा नेते नितिनभाऊ गांगुर्डे, नोमन शहा, विनोदभाऊ जाधव,पत्रकार प्रशांतजी गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.