चंद्रपूर जिल्ह्यात (दि.28जून) रोजी सोमवारी एकही मृत्यु नाही, 65 कोरोनामुक्त तर सात कोरोना पॉझिटिव्ह

    57
    Advertisements

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.28जून):- जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या तसेच मृत्युच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सात जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

    बाधित आलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 3, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 1, राजूरा 0, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.
    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 651 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 796 झाली आहे. सध्या 328 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 54 हजार 188 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 66 हजार 585 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1527 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

    प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.