नासिक कॉलेज रोडला पावणेतेरा लाखाची घरफोडी

    44
    Advertisements

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

    नाशिक(दि.कॉलेज रोड भागातील बंगला फोडून चोरट्यांनी घरातील दहा लाखाची रोकड सह अलंकार सुमारे 12 लाख 68 हजार रुपयांचा डल्ला मारला या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुंदर दत्त राम भुसारे राहणार येवलेकर मळा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे कॉलेज रोड भागातील येवलेकर मळ्यात संजय दसपुते यांचा शरद नावाचा बंगला आहे या बंगल्यावर भुसारी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात दसपुते कुटुंब बाहेर गावी वास्तव्यास आहे.

    गुरुवारी रात्री दिनांक 24 रात्री अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या उत्तर भिंतीच्या पहिल्या माळ्यावरील लोखंडी खिडकीचे गज कापून ही चोरी केली बंगल्यात शीर लेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून दहा लाखाची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 12 लाख 68 हजार किमतीचा ऐवज चोरून नेला अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहे