नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडेना

    43
    Advertisements

    ?लाखो रुपयांची वास्तु धुळखात, तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत

    ?पिंपळगाव भोसले येथे तलाठी कार्यालयाची ईमारत पुर्ण होऊनही सुद्धा भाड्याच्या खोलीत

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रम्हपूरी(दि.1जुलै):-ब्रम्हपुरी तालुक्यातील सात हजार लोकसंख्या वस्तीचे,धान व भाजीपाला पिकासाठी वैनगंगा नदीच्या सामराज्य विस्तारातील पिंपळगाव भोसले येथे दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करुन तलाठी कार्यालयाची ईमारत बांध काम पुर्ण होऊनही भाड्याच्या खोलीतच तलाठी कार्यालय असल्याने नवीन तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनाचा महसूल प्रशासनाला मुहूर्त सापडेल का?अशी समस्त ग्रामस्त मंडळीत चर्चेवरुन दिसुन येत आहे.चिमुर विधान सभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया चंन्द्रपुर जि.प. चे माजी उपाध्यक्ष क्रीष्णा सहारे,प.स. चे माजी उपसभापती विलास ऊरकुडे हे या बांधुन पुर्ण झालेल्या तलाठी उध्दघाटन त्वरीत करा म्हणुन उपविभागीय अधीकारी क्रांती डोबे यांना बैठकी दरम्यान सांगुनही आता दोन वर्ष पुर्ण होऊनही तलाठी कार्यालयाचा उद्घाटन होऊ शकला नसल्याने भाड्याच्या खोलीतच आहे.

    पिंपळगाव भोसले येथे दहा वर्षा पुर्वी लाखो रुपये खर्च करुन तलाठी कार्यालयाची मजबुत सर्व सुविधा युक्त इमारत बांधकाम पुर्ण झाले.परंतु या इमारतीचे उद्घाटन अद्यापही झाले नसुन महसुल प्रशासन ह्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहुर्तमेढ शोधत असुनही सात आठ वर्षानंतरही मुहुर्त सापडत नसल्याने सदर तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीतच असुन ते गावाच्या एका टोकावर असल्याने तलाठी केव्हा येतो केव्हा जातो याचा तर पत्ताच लागत नसुन ग्रमस्त मंडळींना मजुरी सोडुन विनाकारण चकरा मारुन वेळेवर तलाठीच मिळत नसल्याने हिरमुसल्या चेह-यानी वापस जावे लागत असल्याने ब्रम्हपुरी महसुल प्रशासनाने सदर दहा वर्षापुर्वी बांधुन झालेल्या पिंपळगाव च्या तलाठी कार्यालयाचा त्वरीत मुहूर्त शोधुन उद्घाटन करावा अशी मागणी पिंपळगाव वासिय जनतेकडुन केली जात आहे.