हदगांव येथे दिव्यांग साहित्य वाटप शिबीर

    45

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

    नांदेड(दि.2जुलै):-केंद्र शासनाच्या दिव्यांग व वयोश्री एडीप योजनेंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण, जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, एल्मिको कृत्रिम अंग कानपुर, दिव्यांग विकास संघर्ष समिती यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या १४ डिसेंबर २०१९ रोजी ७३८ दिव्यांग व्यक्ती व २०३ वयोश्री कृत्रिम मोजमाप अवयव योजनेचा शिबीर संपन्न झाला होता. त्यानुसार दिव्यांग व वयोश्री एडीप कार्यक्रमातील दिव्यांग व्यक्ती सहाय्यभुत साधने व कृत्रिम अवयव दिव्यांग साहित्य वाटप शिबीर २ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा हदगांव येथे करण्यात आले.

     कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.माधवराव पाटील जवळगांकर, उप विभागीय अधिकारी तथा तहसिलदार हदगांव जिवराज डापकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, आर.एस बजाज, व तसेच दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल आणि पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य व नगर परिषदेच्या उपाध्यक्ष सुनिल भाऊ सोनुले, डाॅ. प्रदिप स्वामी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला.
    या कार्यक्रमात २३ दिव्यांग व्यक्तीला ट्राय मोटारसायकल बॅटरीवाले, ६९ ट्राय सायकल, व्हिल चेअर, श्रवण यंत्र, काठ्या, चष्मे , दांताची कवठी, वाटप करण्यात आले. व तसेच नांदेड जिल्हात सर्वात जास्त दिव्यांग साहित्य व ५ टक्के जि.प‌. दिव्यांग निधी हा हदगांव तालुक्यात मिळाले आहे. असे मत मा.आ. माधवराव पाटील जवळगांकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

    व तसेच गट विकास अधिकारी केशव गड्डापोड, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, दिव्यांग शाळेचे शिक्षक आणि दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांचे खुप कौतुक केले.या कार्यक्रमात दिव्यांग सहाय्यता कक्षाचे प्रमुख माधव आवळे, व गजानन मोरे, प्रमोद टारफे, प्रदिप सोनटक्के, गजानन दांगट, रंजित लोखंडे, रामदास मिराशे, सुधा पांडे, वैभव सुरोशे, संजय डमरे, राम वट्टमवार , शिवाजी पाळेकर, विश्वबंर खाकरे, शिवकुमार काष्टे, रविंद्र आचार्य, लक्ष्मण राठोड, डि‌‌.के. लकडे, व्हि.टी. राठोड, यांनी या कार्यक्रमात विशेष परीश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला.आणि या कार्यक्रमात अतिशय सुंदर सुत्र संचालन प्रदिप सोनटक्के यांनी केले व आभार बिडीओ केशव गड्डापोड यांनी मानले. त्यावेळी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल, जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण, शेख शबाना, सुरज राठोड, श्रीराम आनेबोईनवाड, संतोष सुर्यवंशी, कुबेर राठोड यावेळी उपस्थित होते.‌‌..