Advertisements
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)
गेवराई(दि.8जुुलै):-शहरातील संजय नगर कोल्हेर रोडवर वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गारगोटी देवीचे मंदिर आहे या देवी मंदिराच्या जागेवर अनेक दिवसापासून अतिक्रमणे करून पक्के बांधकाम सुरू आहे ती बांधकामे काढावीत या मागणीसाठी वडार समाजाचे तालुका अध्यक्ष सुभाष गुंजाळ यांनी तहसीलदार मुख्याधिकारी जिल्हाधिकारी उपायुक्त यांना निवेदन दिले होते.
याची कसलीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याने व देवी मंदिराच्या जागेवरील बांधकामे सुरू होत असल्याने सुभाष गुंजाळ यांनी बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मंदिरात सकाळी उपोषणास सुरूवात केली आहे या जागेवर पक्के बांधकाम त्वरित बंद करावीत अशी मागणी उपोषणादरम्यान केले आहे