✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.8जुलै):- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या परंपरेतील सत्पुरु सत्पुरुष प. पु. लक्षणदादा नारखेडे यांचा आज जन्मदिन ८ जुलै १९२७ रोजी चा सहजता काय असते दादा कडून शिकावं, अहंकार रहित जीवन कर्मयोगी संत प. पु. तुकारामजी दादां गीतांनर्यांच्या आदेशानुसार जीवनभर जगले. त्यांचा श्वास न श्वास गुरुदेवांना समर्पित होता, नारखेडे दादांच्या चरणी कोटी कोटी वंदन श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले. श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे श्री लक्ष्मण दादा नारखेडे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथिल सर्वाधिकारी श्री. प्रकाश महाराज वाघ सरचिटणीस श्री. जनार्दनजी बोथे श्री तुंडलवार गुरुजी श्री. सयाम गुरुजी श्री. डॉ. राजाराम जी बोथे श्री. धिरज इंगळे श्री. मोरेश्वर उईके व अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व श्री गुरुदेव आत्मानुसंधान भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथील सर्व भाविक भक्ताच्या उपस्थितीत सत्संग भवन भु- वैकुंठ अड्याळ टेकडी येथे संपन्न झाला.