हरनाळी येथील संत बाळूमामा सभागृहाचे लोकार्पण संपन्न..

    39

    ✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

    बिलोली(दि.9जुलै):- तालुक्यातील हरनाळी येथील संत बाळूमामा मंदिर सभागृहाचे लोकार्पण दिनांक 9/7/2021 रोजी मा.आमदार सुभाषरावजी साबणे यांच्या हस्ते पार पडला असुन साबने आमदार असताना त्यांच्या निधीतुन 7 लक्ष रूपये मंजुरी मिळालेल्या सभागृहाचे लोकार्पण मोठ्या थाटात पार पडला असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आमदार सुभाषरावजी साबने होते.

    तर प्रमुख पाहुऩे बाबाराव पा.रोकडे शिवसेना तालुकाध्यक्ष, सरपंच साहेबराव पा.शिंदे,छावा जिल्हाध्यक्ष बालाजी पा.शिंदे,लक्ष्मण होरके सोसायटी संचालक,दत्तराम पा.गादगे नागणी उपसरपंच,सोनु सब्बनवार युवा शहराध्यक्ष कुंडलवाडी,उत्तमराव देगावे सोसायटी संचालक,रूक्माजी होरके,साईनाथ कोंबरे,ईरफानशाह डौर,भाऊसाहेब बनबरे,आदी उपस्थित होते.

    हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर होरके,रमेश पा.शिंदे,श्रीरंग पा.शिंदे,साईनाथ होरके,नागोराव जलदेकर,साईनाथ चोरमारे,मारोती जजगेकर,पिराजी लालु जजगेकर,मारोती होरके,लक्ष्मण जजगेकर शंकर भंडारे आदींनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन साईनाथ कवडेकर यांनी मानले.