सरकारी सेवा-सुविधा शोधण्यासाठी ‘उमंग’ अँपमध्ये नकाशा सेवा उपलब्ध

    46
    Advertisements

    ✒️विशेष प्रतिनिधी(अतुल उनवणे)

    व्यक्तीच्या जवळील सरकारी सुविधा शोधण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘मॅपमायइंडिया’ कंपनी सोबत सामंजस्य करार करून ‘उमंग’ (UMANG) अँप मध्ये नकाशा सेवा सक्षम केल्या आहेत.या सेवेमुळे आता भौगोलिक दृष्ट्या जवळपास असणाऱ्या मंडया, रक्तपेढ्या अशा अनेक सरकारी सेवासुविधा सहजपणे शोधून काढणे नागरिकांना शक्य होणार आहे.

    मॅपमायइंडियाने गल्लीबोळ आणि गावपातळीपर्यंत सर्व बारकाव्यांनिशी तयार केलेल्या व नकाशावाचन करणाऱ्याशी संवाद साधणाऱ्या तपशीलवार नकाशासंग्रहावर या सुविधा पाहता येणार आहेत.

    ठिकाणापर्यंतचे अंतर, दिशादर्शन, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणाऱ्या सूचना ऐकू येणे व दृश्यात्मक मार्गदर्शन हेही यामध्ये शक्य होणार आहे. तसेच रहदारी आणि रस्ते-सुरक्षाविषयक सूचनाही यामध्ये मिळू शकणार आहेत.

    पुढील सेवांसाठी नकाशा सुविधा पुरवण्यास सुरुवात केली गेली आहे.

    ?मेरा राशन*- मॅपमायइंडियाच्या नकाशावर स्वस्त धान्य दुकाने पॉइंटर स्वरूपात दाखवलेली असल्याने, उमंगच्या मदतीने वापरकर्त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी दिशा कळू शकतात.

    ?eNAM*- उमंगच्या माध्यमातून वापरकर्त्याना ‘माझ्याजवळची मंडई / मंडी/ घाऊक बाजारपेठ’ ही सुविधा मिळत असल्याने नकाशावरील पॉइंटरच्या मदतीने दिशा समजून तिचे ठिकाण नेमकेपणाने समजण्यास मदत होणार आहे.

    ?दामिनी*- ‘विजांच्या लखलखाटासंबंधी धोक्याची पूर्वसूचना’ देणाऱ्या या सुविधेमुळे वापरकर्त्यांना काही मिनिटांपूर्वी वीज कोसळलेल्या जवळपासच्या भागाची दृश्यस्वरूपात माहिती मिळू शकते. पूर्वसूचना देणाऱ्या या यंत्रणेमुळे वीज पडणाऱ्या संभाव्य ठिकाणाची माहिती नकाशावर दिसू शकते.