बकरी ईद

    69
    Advertisements

    “बकरी ईद” निमित्त नमाज अदा करून देशभरातील मुस्लिम बांधव एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत आलिंगन देत शुभेच्छा देत असतात.शहरातील ठिकठिकाणच्या मशिदीत एकाचवेळी हजारहून अधिक मुस्लिम बांधव तसेच ग्रामीण भागात एकाच ठिकाणी असलेल्या मशिदीत गावातील सर्व मुस्लिम बांधव एकाचवेळी नमाज अदा करत असतात.पण यावर्षी मात्र कोरोना महामारीमुळे हे सर्व शक्य नाही.रंगीबेरंगी नवीन कपडे,सुगंधी दरवळ,खमंग पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या गर्दीने प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या घरातील वातावरण भारून गेलेले असते.ईदच्या सुट्टीनिमित्त फिरायला जाणे,गावाकडील आई – वडिलांना तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठी बहुतेक कुटुंब पसंती देत असतात.पण यावर आता कोरोनामुळे बरीच बंधने आली आहेत.सण का साजरा केला जातो ?’रमजान’च्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर जवळपास ६० ते ७० दिवसानंतर हा सण साजरा केला जातो.इस्लामिक मान्यतेनुसार हजरत इब्राहिम आपला मुलगा हजरत इस्माईल याला याच दिवशी ईश्वराच्या आदेशानुसार ‘कुर्बान’ करण्यासाठी घेऊन निघालेे होते.तेंव्हा अल्लाहने त्यांच्या मुलाला जीवनदान दिले.या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.

    सणामधून समर्पणाची भावना’ईद उल अजहा’ किंवा ‘ईदे- अजहा’ हा सण प्रामुख्याने ‘बकरी ईद’ म्हणून ओळखला जातो.हा सण मुस्लिम धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो.मुस्लिम धर्मियांमध्ये एकूण तीन प्रकारे ईद साजरी केली जाते.त्यातील इतर दोन प्रकार म्हणजे ईदुलफित्र किंवा रमजान ईद आणि मिलादुन्नबी ईद.हे तीनही सण बंधुभाव,त्याग,समर्पण आणि मानवतेचा संदेश देतात.ईद ला वेगवेगळ्या नावाने ओळखतात ‘ईद उल अजहा’ ला अनेक नावांनी ओळखले जाते.या ईदला ‘नमकीन ईद’ किंवा ‘ईदे कुरबां’ असेही म्हटले जाते.या दिवशी चटपटीत खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने ‘नमकीन ईद’ तसेच या सणाचा ‘कुर्बानी’शी संबंध असल्याने ईदे कुरबां’ म्हटले जाते.कुर्बानी कशासाठी ?सर्वसामान्यपणे या सणाचा संबंध बकऱ्याशी लावला जातो,पण प्रत्यक्षात तसे नाही.’बकर’ या शब्दाचा अर्थ ‘मोठा प्राणी’असा होतो.ज्याचा ‘जिबह’ म्हणजेच बळी दिला जातो,असा आहे.

    यातून ‘बलिदान’ अर्थात ‘त्यागा’ची भावना अधोरेखीत केली जाते.अरबी भाषेत ‘कर्ब’ या शब्दाचा अर्थ अत्यंत जवळ असा होतो.म्हणजेच यावेळी ईश्वर व्यक्तीच्या सर्वात जवळ असतो.परंतु भारत,पाकिस्तान आणि बांग्लादेशात या शब्दाचा अपभ्रंश झाल्याने या सणाला ‘बकरा ईद’ असे म्हटले जाते.या दिवशी कुर्बानीचा एक हिस्सा कुटुंबीयांसाठी,दुसरा हिस्सा नातेवाईकांसाठी आणि तिसरा हिस्सा गोरगरिबांसाठी देण्याची प्रथा आहे.हिंदूधर्मीयांच्या दिनदर्शिकेत दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो.त्यामुळे मुस्लिमधर्मीयांचा एक महिना अगोदर येतो.त्यामुळे २०१५ नंतर २०१६ आणि २०१७ अशी सलग तीन वर्षे गणेशोत्सवात बकरी ईद आलेली होती.तर २०१८ मध्ये मात्र श्रावण महिन्यात बकरी ईद आलेली होती.

    अशा प्रकारे बकरी ईद चे महत्त्व असून मोठ्या आनंदाने मुस्लिम बांधव बकरी ईद साजरी करत असतात.या दिवशी सर्वजण एकमेकांना आलिंगन देवून बकरी ईद च्या शुभेच्छा देत असतात पण आता कोरोना संकटामुळे हे जास्तीचे शक्य होणार नाही.अशा या पवित्र बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!!!

    ✒️राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो.९४२३१७०८८५