बांधकाम विभाग आजून किती जणांचे घेणार बळी – एकनाथ रोकडे

    46
    Advertisements

    ✒️दिनेश लोंढे(विशेष प्रतिनिधी)

    जावली(दि.२२जुलै):- बांधकाम विभागाच्या भोंगळ निकृष्ठ व अर्धवट चाललेल्या सातारा मेढा महाबळेश्वर च्या रस्त्याच्या ढिसाळ कामामुळे मोरावळे येथे १७ जुलै रोजी टू व्हीलर गाडी स्लिप होऊन अपघात झालेला ३४ वर्षीय युवक सुशांत प्रकाश कांबळे याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली २० जुलै रोजी पहाटे पाच वाजता आधार हॉस्पिटल सातारा येथे प्राणज्योत मावळली .बांधकाम विभागाच्या निकृष्ट व अर्धवट चाललेल्या कामामुळे दरवर्षी रस्त्यावर अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले असून अनेक कुटुंबातील प्रमुख अपघातात संपल्यामुळे व जखमी झाल्याने संपूर्ण कुटुंब बरबाद झालेली आहेत.

    त्यामुळे अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुक्याच्या वतीने मेढा पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री.अमोल माने साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे .सातारा मेढा महाबळेश्वर रस्त्याचे काम गेले दोन वर्षे रखडलेले आहे रस्त्याची पुलांची अर्धवट कामे झालेली आहेत त्यामुळे काही ठिकाणी रस्ता धोकादायक बनलेला आहे ,रस्त्यावर कोठेही रेडियम किंव्हा सूचना फलक नाहीत , काम सुरू असताना वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षिततेचे उपाय केले नाहीत त्यामुळे गेले दोन तीन वर्षांत रस्त्यावर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत व अनेक जण जीव मुठीत घेऊन गाडी चालवत आहेत.

    पावसाळ्यात तर रात्रीचे वाहन चालवताना जीव टांगणीला लागतं आहे , लोकप्रतिनिधी तर डोळ्याने बघून आंधळे बनत आहेत व आश्वासन देण्याचेच काम करीत आहेत खरी परवड सामान्य लोकांचीच होत आहे .रस्त्यांची कामे विनाकारण अर्धवट स्वरूपात रखवडल्याने अनेकांचे आपघात होऊन मृत्यू झालेले आहेत त्यामुळे लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात येत आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाई चे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिलेला आहे