✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185
बीड(दि.23जुलै):- केज तालुक्यातील मौजे नायगाव या गावाचे चे भूमिपुत्र सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व एस.ए. एस.सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल चे संचालक डी. एम.मुजमुले यांची महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ फेडरेशनच्या प्रदेशचिटणीस पदी निवड करण्यात आली. फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष दीपक आगळे पाटील यांनी ही निवड नुकतीच जाहीर करून निवडीचे पत्र दिलेले आहे.नायगाव येथील जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल व सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, व पत्रकारिता क्षेत्रात डी.एम.मुजमुले काम करत आहेत.
त्याचसोबत छोट्या सामाजिक संस्थांना कोणतेही काम मिळत नाहीत ज्या पिशवीतून(बागेतून) अजून बाहेर निघाल्या नाहीत.ज्यांना शासकीय योजना,विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कोणतेही फंड मिळालेले नाहीत.अशा संस्था बंद पडतात.त्यांना उभे करणे,सामाजिक दबाव गट निर्माण करून संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत त्यासाठी विविध फंड,प्रकल्प कसे मिळतील यासाठी हे फेडरेशन काम करणार आहे. बीड जिल्ह्यातील ज्या छोट्या संस्था आहेत ज्यांना आजही शासकीय किंवा इतर फंड मिळालेले नाहीत त्यांनी ह्या फेडरेशन मध्ये सामील होऊन सर्व मिळून आपण यासाठी फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष दीपक आगळे पाटील यांच्या माध्यमातून आपल्या संस्था उभारणीसाठी काम करू यासाठी आपण या व्हाट्सएप नं 9623657254 या क्रमांकावर आपल्या संस्थेची माहिती पाठवा.जिल्हा कार्यकारिणीची निवड करून लवकरच जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवणार आहोत असे यावेळी सांगितले.या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातुन व मित्रपरिवाकडून स्वागत होत आहे.