लफडं करणे जिवाला घातक??

    47
    Advertisements

    ?बॉयफ्रेंडने लग्नाला दिला नकार, गर्लफ्रेंडने जे केलं ते….. वाचा

    ✒️औरंगाबाद,विभागीय प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

    औरंगाबाद(दि.29जुलै):-बीड मधील प्रसिद्ध असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी करत असणाऱ्या एका नर्सने प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे, गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव, सोनाली जाधव असे असून, सदर मुलगी दीप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होती. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बीड मधील एका रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी करत असणाऱ्या सोनाली अंकुश जाधव, वय-26 वर्ष, हिने मांजरसुबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत २६ जुलै रोजी मृतदेह सापडला आहे.
    चौकशीनंतर सदर युवतीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

    यासंदर्भात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही युवती, पालवान चौकात राहात होती. तसेच ती दिप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून सेवा करीत होती. तिचे बीडमधील एका खाजगी लॅबमध्ये काम करणाऱ्या, अक्षय राजाभाऊ आव्हाड, वय-२७ वर्षे, राहणार डोईफोडवाडी, याच्यासोबत प्रेम संबंध होते. अनेक दिवसापासून प्रेम संबंध असल्याने, सोनाली हिने अक्षयला लग्न करण्याची मागणी केली होती.

    मात्र सुरुवातीला अक्षयने लग्नाची बाब फेटाळून लावली. नंतर सोनाली हिने लग्न करण्याचा जास्त आग्रह धरल्यामुळे अक्षयने लग्नास नकार दिला होता. अक्षयने लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून सोनाली जाधव हिने, मांजरसुबा घाटातील पालीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सोनाली जाधवचा भाऊ, जाधव याने, अक्षय आव्हाड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.