?१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)
पुणे(दि.29जुलै):-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे १०१ वी जयंती येत्या १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट रोजी जयंती महोत्सव पार पडणार असून पुण्यातील अण्णा भाऊ साठे पुतळा, सारसबाग पुणे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हा महोत्सव पार पडणार आहे अशी माहिती पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीने स्वागत अध्यक्ष राजाभाऊ धडे, सचिव संजय केंदळे, सांस्कृतिक समितीचे सुजित रणदिवे, राजेश रासगे, गणेश चांदणे, बापू पाटोळे, संतोष माने आदींनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
१ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मात्र सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून समाजातील बांधवांनी कार्यक्रमाच्या स्थळी गर्दी करू नये. घरी राहूनच हा महोत्सव पहावा असे आवाहन करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा या महोत्सवाचे उद्घाटन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून होणार आहे. ४.०० ते सायं. ६.०० वा. शाहिरी जलसा हा कार्यक्रम पार पडणार आहे. सादरकर्ते शा. सदाशिव भिसे, शा. अभिमन्यु लोखंडे, बालशाहीर कु. तृप्ती लोखंडे हे आहेत. तर सांय. ६ ते सायं ७ वा व्याख्यान होणार असून व्याख्यानकर्ते – डॉ. श्रीपाल सबनीस हे आहेत.
सोमवार २ ऑगस्ट रोजी ४ ते सायं ६ वा भारूडचा कार्यक्रम होणार आहे. सादरकर्ते शाहीर प्राण जाधव सांय . ६ ते सायं ७ वा व्याख्यान व्याख्यानकते – नितीन पवार कामगार नेते यांचे असणार आहे. मंगळवार दि . ३ ऑगस्ट रोजी सायं ४ ते सायं ६ वा प्रबोधन गिते सादरकर्ते प्रा महादेव खंडागळे आणि सहकारी सायं . ६.०० ते साय ७.०० वा – व्याख्यान व्याख्यानकर्ते – डॉ . प्रदिप मोहिते तर बुधवार दि . ४ ऑगस्ट २०२१ रोजी सायं ४ ते सायं ६ वा परिसवांद सहभाग – प्रा . श्रावण देवरे विषय- आरक्षण वर्गीकरण सायं . ६ ते साय ७ वा – व्याख्यान व्याख्यानकर्ते – प्रा केशव शेकापुरकर यांचे असणार आहे.
गुरूवार दि . ५ ऑगस्ट २०२१ रोजी सायं ४.०० ते सायं ६ वा महिला परिसवांद सहभाग डॉ.निलमताई गोल्हे उपसभापती , शिवसेना नेत्या विषय- महिला सक्षमीकरण सायं ६ ते ७ व्याख्यान व्याख्यानकर्ते – प्रा . सौ . संगिता दावखे ( विषय- बचत गट आणि महिला सक्षमीकरण असे सलग पाच दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून समाजातील बांधवांनी कार्यक्रमाच्या स्थळी गर्दी करू नये असे आवाहन पुणे जिल्हा मातंग समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.