इसाद शिवारात रानडुकरांचा उच्छाद, बंदोबस्त करण्याची मागणी

    38

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

    गंगाखेड(दि.2ऑगस्ट):- विधानसभा मतदारसंघातील बारमाही ओलीताखाली असलेल्या ईसाद परिसरात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे . यामुळे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले असून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे .
    या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सोमवारी तहसीलदार व उपविभागीय अधिकार्‍याकडे प्रत्यक्ष भेटून करण्यात आली. ईसाद शिवार हे बारमाही ओलिताखाली असलेला परिसर. या परिसरात ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते .बारमाही ओलीताखाली असल्याने या भागात जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.

    रानडुकराणी मात्र या हंगामात हैदोस घातला असून रानडुकराचे कळप परिसरात वावरताना दिसत आहेत .यामुळे पिकाची नासाडी होत असून शेतकरी व शेतमजूर मात्र भयभीत झाले आहेत. तरी या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी शेख खमरोड्डीन शेख समशोद्दिन, समीर शेख ,सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे ,शिवाजी महाराज बोबडे, गंगाधर कुकडे, गजाननराव पारवे, मालेवाडी चे माजी सरपंच श्रीकांत गायकवाड आधी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .