विद्रोहाचे धडे गिरवत,
प्रस्थापितांची मुरवत…
गावकुसाबाहेरील माणसांची..
राजकिय चळवळ पुढे नेतांना,
तुझ्या पायाला आलेले फोड पाहून..
सत्ता परिवर्तनाचा ज्वालामुखी धगधगतेय..!
हे धैर्यशिलवान नेतृत्वा..!
तुझी स्वाभीमानी वाघाची चाल,
षंढ माणसांच्या मुठी
आवळण्यास मजबूर करतेय..!
पिढ्यान् पिढ्या सत्तेपासून दुर आलुते-बलुतेदार एकजुटीने,
जनआक्रोश उभारतेय..!
पुन्हा या देशात,
या माजूर व्यवस्थेचा कणा
मोडण्यासाठी..!
तु पराजयाने खचून न जाता,
लढा उभारला रणात निधड्या छातीने..!
अगदी महामानवाच्या अंगुली निर्देशाप्रमाणे…!
क्रांतीबीज बनून पोलादी फौजांच्या सवे,
हाती समतेचे शस्त्र घेऊन..!
विषमतेचे बीज पेरणा-या अघोरी कृत्यास,नेस्तनाबुत करण्यासाठी!
भाषा करीताहेत आजही बांडगुळे
बदलविण्याची संविधान..!
अन् भडकविण्या जातीयदंगलीचे तांडव, या देशात तेंव्हा…
बुध्दाच्या मध्यम मार्गाने,
तुच केलेस सर्वांना सावधान..!
हे धुरंधरा..!
तू दाखवून दिलेस येथल्या मेंग्या संस्कृतींच्या ठेकेदारास..!
तू आहेस लढवय्या पुर्वजांचा वंशज..!
तुझी आगेकूच सुरूच ठेव…
तुझ्या पाठीशी शोषितांचा जनसागर उसळतेय..!
जुल्मी सत्ताधा-यांचे तख्त उधळून लावण्यासाठी..!
सत्ता संपादनाच्या..!
तुझ्या ह्या क्रांतीकारी पाऊलास..
माझा निळा सलाम..!
✒️शब्दांकन:-भीमटायगर पंजाबराव कांबळे,यवतमाळ(9850342588)