Advertisements
*सन्मार्गाने जगणे सोडून ,*
*भलतीकडेच वळलो मी..!*
*मेंदू सशक्त असतांना,*
*भोंदूकडेच पळलो मी..!*
*भेटीगाठी तिथे तयांच्या,*
*शब्दांनी फळ् फळलो मी..!*
*लबाड, स्वार्थी, धुर्तांसवे,*
*दिनरात हळ् हळलो मी..!*
*फसगत केली माझी तयांनी,*
*ज्यांना ज्यांना कळलो मी..!*
*मुर्दाड माणसे जिथे जळली,*
*स्मशानी त्या जळलो मी..!*
****************************
✒️शब्दांकन:-भीमटायगर पंजाबराव कांबळे(यवतमाळ)मो:-9850342588
****************************