सुवर्णमहोत्सवी शाळेत संत शिरोमणी सावता महाराज स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…..

    62
    Advertisements

    ✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    धरणगांव(दि.7ऑगष्ट):-शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे संतांचे संत – सत्यशोधक – संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.शाळेचे ज्येष्ठ शिक्षक एम.बी.मोरे यांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सत्यशोधक – संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या कामामध्ये परमेश्वर पाहिलेला आहे आणि ते आपल्या अभंगांमध्ये म्हणतात.

    कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी ॥ लसूण मिरची कोथंबरी । अवघा झाला माझा हरि ॥स्वकर्म में हों रत । मोक्ष मिळे हातो हात ॥ सावत्या ने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥

    अशाप्रकारे आपल्या अभंगातून समाजप्रबोधन करणाऱ्या , बहुजन समाजाला शाश्वत सत्य सांगणारे महान संत शिरोमणी सावता महाराजांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.